रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:36 PM2018-03-04T21:36:59+5:302018-03-04T21:36:59+5:30

लोकसंख्या आणि अंतराच्या निकषावरच वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य संस्थेची स्थापना करण्यात येते. रूग्णांसाठी डॉक्टर हा देव असतो.

To get good health care for patients | रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी

रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी

Next
ठळक मुद्देदीपक सावंत : खोडशिवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

ऑनलाईन लोकमत
सडक-अर्जुनी : लोकसंख्या आणि अंतराच्या निकषावरच वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य संस्थेची स्थापना करण्यात येते. रूग्णांसाठी डॉक्टर हा देव असतो. रूग्णांच्या सेवेची गरज लक्षात घेता त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.
सडक-अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण डॉ. सावंत यांच्या हस्ते शनिवारी (दि.३) करण्यात आले. या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, पं.स. सभापती गिरीधारी हत्तीमारे, अर्जुनी-मोरगाव पं.स. सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती राजेश कठाणे, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, माधुरी पातोडे, शीला चव्हाण, सरिता कापगते, माजी पं.स. सभापती कविता रंगारी, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, पं.स. सदस्य इंदू परशुरामकर, सरपंच उर्मिला कंगाले, उपसरपंच टेकराम परशुरामकर यांची उपस्थिती होती.
पुढे डॉ.सावंत म्हणाले, आरोग्य सेवा ही राजकारणविरहीत असली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील ८६ टक्के डॉक्टरांची पदे भरली आहे. यासाठी पालकमंत्री बडोले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील समस्या सोडविण्यात येतील. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या इमारतींच्या भूमिपूजनाची कामे प्रलंबित असल्यामुळे ही भूमिपूजने पालकमंत्र्यांनी तातडीने करावीत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम त्वरित होण्यास मदत होईल. येत्या सहा महिन्यात सौंदड ग्रामीण रु ग्णालयाच्या समस्या सोडविण्यात येतील. खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकही दिवस डॉक्टरविना राहणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही नवीन पध्दतीची आहे. ही इमारत चांगली आणि दर्जेदार व्हावी यासाठी विशेष लक्ष देण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आरोग्य अधिकाºयांचे कर्तव्य असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आता चांगली वास्तू निर्माण झाल्यामुळे चांगली आरोग्य सेवा देखील आरोग्य विभागाने द्यावी. सौंदड ग्रामीण रूग्णालयातून चांगली आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून बडोले म्हणाले, सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाला पाहिजे. आरोग्य सेवा देताना वैद्यकीय अधिकारी देखील उपलब्ध झाले पाहिजे. सौंदड ग्रामीण रूग्णालयासाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला पाहिजे. तसेच या रूग्णालयासाठी नवीन इमारत देखील तयार झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
या वेळी पं.स. सभापती गिरीधारी हत्तीमारे, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करणारे कंत्राटदार विष्णू अग्रवाल यांचा आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
प्रारंभी आरोग्य मंत्री डॉ. सावंत, पालकमंत्री बडोले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले. आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. कार्यक्र माला खोडशिवणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी मांडले. आभार शेंडे यांनी मानले.
बांधकामावर ४.२८ कोटींचा खर्च
खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत ८९४ चौरस मीटर जागेवर उभारण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्याचे टाईप-१ निवासस्थान २०६ स्क्वेअर मीटरवर, टाईप-२ बांधकाम २१० स्क्वेअर मीटर, पहिल्या माळ्याचे बांधकाम २१० स्क्वेअर मीटर आणि टाईप-३ चे बांधकाम २१० स्क्वेअर मीटर करण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, १४ कर्मचाºयांचे निवासस्थान, सुरक्षा भिंत, रस्ते, बोअरवेल, विद्युतीकरण, फर्निचर, बगीचा, बायोमेडिकल वेस्ट पीट, गप्पीमासे पैदास केंद्र तयार करण्यात आले आहे. या इमारतीच्या बांधकामावर ४ कोटी २८ लाख २२ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे.

Web Title: To get good health care for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.