रेल्वे,हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा पास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:28+5:302021-08-22T04:31:28+5:30
कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट असतानाच राज्यातील काही जिल्ह्यात मात्र त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. यामुळे ...
कपिल केकत
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट असतानाच राज्यातील काही जिल्ह्यात मात्र त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. यामुळे आता राज्य शासनाने व्यापाऱ्यांच्या मागणीवरून निर्बंधात शिथिलता दिली असून दुकानांना वेळ वाढवून दिली आहे. शिवाय रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल्सलाही परवानगी दिली आहे. मात्र यासाठी कोरोनाचे दोन्ही डोस घेण्याचे प्रमाणपत्र बाळगण्याची सक्ती केली आहे. हे युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास नागरिकांना घरबसल्या मिळविता येत असून यासाठी विशेष प्रक्रिया करावयाची आहे.
------------------
जिल्ह्यात दोन्ही डोस घेतले किती? (पॉईंटर्स)
फ्रंट लाईन वर्कर्स - १२६६१
आरोग्य कर्मचारी -६१३८
१८ ते ४४ वयोगट - ३६३९३
४५ ते ६० - ६३४४१
६० पेक्षा जास्त वयाचे - ३८२३९
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण (टक्क्यात) - १३
-------------------------------
२) असा मिळवा ई-पास
- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
-त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
-त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
-त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
-या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाइल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस) द्वारे लिंक प्राप्त होईल.
- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.
-----------------------------