स्वातंत्र्यानंतरच्या मोठ्या लढ्यासाठी सज्ज व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:46 PM2019-08-10T23:46:26+5:302019-08-10T23:47:29+5:30
आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली. जय ओबीसी, लोकशाही वाचवा देश वाचवा, संविधान वाचवा-देश वाचवा, अशा घोषणा देत शहराच्या विविध मार्गावरून जनआक्रोशन रॅली काढण्यात आली.
शहराच्या इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातून दुपारी १ वाजता रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध ५२ संघटनांनी सहभाग घेतला.रॅलीचे नेतृत्त्व जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, आदिवासी नेता डॉ.नामदेव किरसान,धनराज तुमडाम, जुबेर, मेहताबभाई, बलीराज धोटे, ओबीसी नेता श्रावण कटरे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, जीवन शरणागत, आम आदमी पक्षाचे पुरुषोत्तम मोदी, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.सतीश बंसोड, नंदूरकर, समता संग्राम परिषदेचे विनोद मेश्राम, राजू राहुलकर, मराठा सेवा संघाचे क्रांती ब्राह्मणकर, संभाजी ब्रिगेडच्या सविता बेदरकर, भाकपचे हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, ओबीसी संघटनेचे कैलास भेलावे, सचिन रहांगडाले,विकास लिल्हारे,प्रदीप राठोड,प्रमिला सिंद्रामे,गोपाल उईके, बसपाचे दिनेश गेडाम, प्रेम साठवने, आरती चवारे, निलेश देशभ्रतार, सुनील भोंगाडे, उत्तम यादव, राजीव ठकरेले यांनी केले. रॅली नेहरु चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक मार्गे इंदिरा गांधी स्टेडियम येथे पोहचल्यावर रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
एससी,एसटी, ओबीसी व इतर समाजाला आता लढाईसाठी सज्ज व्हावे लागेल. गोंदियानंतर देशात ही लढाई लढण्यात येईल.सभेच्या प्रास्तविकातून संविधान मैत्री संघाच्या पौर्णिमा नागदेवे यांनी सांगितले की, समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी संविधान मैत्री संघाचा मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उत्तम यादव म्हणाले, ईव्हीएमच्या नावावर भ्रमीत करून सत्ता काबीज करण्यात आली. व्हीव्हीपॅटची १०० टक्के स्लीप मोजून दाखविल्यास निकाल काही वेगळाच असेल असे सांगितले.मेहताबभाई म्हणाले, सरकारला जागविण्यासाठी असे आंदोलन व्हायला हवे.संविधान वाचविण्याची जवाबदारी कोण्या एका व्यक्तीची नसून संपूर्ण ८० टक्के समाजाची आहे. पुरुषोत्तम मोदी म्हणाले, जे लोक जिवंत आहेत ते लोक आंदोलनात दिसत आहेत. वास्तविकतेत विविध जातींना आपल्या घरातच ठेवून मानवतेची लढाई लढावी लागेल.
सविता बेदरकर म्हणाल्या उन्नाव प्रकराने खरा चेहरा समोर आला. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे चालत आहोत असे सांगितले. जितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याप्रसंगी ओबीसी समाजाच्या नेत्यांना रात्रीच नजरकैदेत ठेवले. हा महाराष्टÑ सरकारचा खरा चेहरा आहे. संचालन शिव नागपुरे, सुनील पटले तर आभार अतुल सतदेवे यांनी मानले.