योजनांचा लाभ घेऊन समृद्ध व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:03 AM2018-04-21T01:03:34+5:302018-04-21T01:03:34+5:30

केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान जिल्ह्यातील तीन गावांत ग्राम स्वराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेवून समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले.

Get rich by taking advantage of the schemes | योजनांचा लाभ घेऊन समृद्ध व्हा

योजनांचा लाभ घेऊन समृद्ध व्हा

Next
ठळक मुद्देराजा दयानिधी : येरंडी-देव येथे ग्राम स्वराज अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान जिल्ह्यातील तीन गावांत ग्राम स्वराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेवून समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले.
ग्राम स्वराज अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देवल येथे गुरूवारी (दि.१९) केंद्र सरकारचे या अभियानाचे नोडल अधिकारी फरीदा नाईक व राजेंदर कुमार यांनी भेट दिली. यानिमित्ताने ग्रामस्थांशी संवाद कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल, पं.स.उपसभापती करु णा नांदगाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजेश राठोड, भिमराव पारखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, सरपंच रेखा खोब्रागडे, तहसीलदार भंडारी, गटविकास अधिकारी नारायण जमईवार प्रमुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना दयानिधी यांनी, यापुर्वी केंद्र सरकारच्या या योजनांचा गावातील ज्या कुटूंबांना लाभ मिळालेला नाही त्यांनी या अभियाना दरम्यान लाभ घ्यावा. सर्वांचे सहकार्य व सर्वांचा सहभाग या अभियानात आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या तीन योजनांचा गावातील प्रत्येक व्यक्तीने लाभ घ्यावा. यासाठी प्रत्येकाने बँक खाते काढावे. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत गावातील कुठलाही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे त्यांनी सांगितले.
नाईक यांनी, जिल्ह्यातील यंत्रणा या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानांतर्गत असलेल्या सात योजनांचा लाभ गावातील प्रत्येक कुटूंबांनी घेतला पाहिजे. यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यास तसेच मार्गदर्शन करण्यास आपण आल्याचे त्यांनी सांगितले. विमा योजनेचा लाभ येरंडी ग्रामस्थ कमी प्रमाणावर घेत असल्याचे दिसून आले आहे असे सांगून त्यांनी, ग्रामस्थांनी स्वत:चे आरोग्य व सुरक्षेचा विचार करु न या विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी बँकेचे अधिकारी-कर्मचारी आपल्या गावात आले आहे. गावातील प्रत्येक घरी एलईडी बल्ब असले पाहिजे, त्यामुळे वीज बिलात बचत होते. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनी योजनेच्या लाभातून शौचालय बांधून घ्यावे. शौचालयाचा वापर देखील कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने करावा असे त्यांनी सांगीतले.
जितेंदर कुमार यांनी, केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानांतर्गत ज्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळणार आहे, त्यामाध्यमातून ग्रामस्थ समृद्ध होण्यास मदत होणार आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीने या योजनांचा लाभ घ्यावा. कुणीही उघड्यावर शौचास बसणार नाही याची प्रत्येकाने शपथ घ्यावी आणि स्वच्छतेला महत्व दयावे असे सांगितले. देना बँकेचे अधिकारी मिश्रा यांनी, येरंडी गावात ५६ कुटूंबांकडे बँक खाते नसून त्यांचे बँक खाते या अभियानादरम्यान काढणार असल्याची माहिती दिली.
गावातील २४६ कुटूंबांकडे गॅस कनेक्शन असून ९३ कुटूंबांना गॅस कनेक्शनचे वाटप या अभियानादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भंडारी यांनी दिली. गावातील एक बालक बाहेरगावी असल्यामुळे लसीकरणापासून वंचित आहे, त्याचेही लवकरच लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे मिशन इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत यांनी सांगितले. यावेळी वीज वितरण कंपनीने सौभाग्य योजनेअंतर्गत १९ कुटूंबांना वीज जोडणी तर उजाला योजनेंतर्गत ग्रामस्थांनी २८ एलईडी बल्ब खरेदी केल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री.लिमजे यांनी दिली.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी केले. आभार विस्तार अधिकारी आर.डी.वलथरे यांनी मानले. कार्यक्र माला येरंडी येथील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ, तालुक्यातील विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी, सर्व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.
गावकऱ्यांशी संवाद व भूमिपूजन
यावेळी नोडल अधिकारी नाईक व राजेंदर कुमार यांनी गावकºयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच नाईक व राजेंदर कुमार यांनी हेमराज रामटेके या लाभार्थ्याच्या घरी जावून आवास योजनेच्या घरकुलाचे तर धीरज पंचभाई या लाभार्थ्याच्या घरी शौचालय बांधकामाचे भूमिपूजन केले.

Web Title: Get rich by taking advantage of the schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.