घरकुल लाभार्थ्यांवरील अन्याय त्वरित दूर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:45+5:302021-02-13T04:27:45+5:30
गोरेगाव : पंचायत समिती अंतर्गत ग्राम गणखैरा येथे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांचे त्वरित पुनर्सर्वेक्षण करून घरकुल लाभार्थ्यांवरील अन्याय ...
गोरेगाव : पंचायत समिती अंतर्गत ग्राम गणखैरा येथे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांचे त्वरित पुनर्सर्वेक्षण करून घरकुल लाभार्थ्यांवरील अन्याय दूर करा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य पुष्पराज जनबंधू यांनी केली आहे.
१५ ऑगष्ट २०१६ व २०१८ या वर्षात पंचायत समितीच्या मागणीनुसार गणखैरा ग्रामपंचायतने ५२० लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीला पाठविली; पण शासनाच्या ऑनलाइन वेबसाईटवर ५१२ नावे अपात्र दिसून येत आहेत. म्हणजे संपूर्ण गरजू घरकुल लाभार्थ्यांवर अन्याय झालेला आहे. याकरिता शासन स्तरावर पुन्हा सर्वेक्षण करून घरकुल लाभार्थ्यांवरील अन्याय त्वरित दूर करावा, अशी मागणी जनबंधू यांनी केली आहे. अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जनबंधू यांच्यासह सरपंच धारा तुप्पट, उपसरपंच राजू मोहबे, लिखन पारधी, खुन्नी पारधी, राजेश रहांगडाले, मोहन दाणी, प्रेम कांबळे, भूमेश पारधी व गणखैरावासीयांनी दिला आहे.