गोंदिया ते पिपरीया व्हाया धापेवाडा बस सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:35 PM2018-04-19T21:35:33+5:302018-04-19T21:35:33+5:30

तिरोडा तालुक्यातील अर्जुनी जि.प. क्षेत्रामध्ये येणाऱ्या वैनगंगा नदी काठावर वसलेल्या सावरा (पिपरीया) या गावापर्यंत गोंदिया ते पिपरीया या मार्गावर एसटी महामंडळाची बस सेवा सुरू करा, अशी मागणी या जि.प. क्षेत्रातील जनतेने केली आहे.

Get started from Gondia to Pipariya via Dhapewada bus | गोंदिया ते पिपरीया व्हाया धापेवाडा बस सुरु करा

गोंदिया ते पिपरीया व्हाया धापेवाडा बस सुरु करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा (बु.) : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी जि.प. क्षेत्रामध्ये येणाऱ्या वैनगंगा नदी काठावर वसलेल्या सावरा (पिपरीया) या गावापर्यंत गोंदिया ते पिपरीया या मार्गावर एसटी महामंडळाची बस सेवा सुरू करा, अशी मागणी या जि.प. क्षेत्रातील जनतेने केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील मध्य प्रदेशच्या सीमेवर लागून असलेला भाग म्हणजे अर्जुनी जि.प. क्षेत्र. सावरा-पिपरीया या गावांचा थेट सरळ संपर्क गोंदिया जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाशी येतो. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही सावरा (पिपरीया) गावापासून सरळ गोंदियाला जाण्यासाठी एसटी बसची सुविधा नाही. येथून गोंदियाला जाण्यासाठी ४ ते ८ किमीचे अंतर सायकल अथवा इतर साधनाने करून बघोली, परसवाडा जोडफाट्यापर्यंत जावे लागते.
अर्जुनी जि.प. क्षेत्रातील किंडगीपार, बोंडराणी, अर्जुनी, सावरा, पिपरीया, खैरलांजी ही महाराष्टÑ सीमेवरची गावे आहेत. तर फुलचूर, मानेगाव, कुंभली, कटोरी, भंडारबोडी, किन्ही, लिलामा, भौरगढ, मोहगाव, टेमनी, खैरलांजी ही मध्य प्रदेशमधील गावे आहेत. या सर्व गावांचा महाराष्टÑातील गोंदिया ही मुख्य बाजारपेठ व व्यापार नगरी असल्याने सरळ संपर्क येत असतो. तेव्हा गोंदियाला जाण्यासाठी येथून एकही एसटी बस नाही. गोंदिया ते सावरा (पिपरीया) व्हाया धापेवाडा या मार्गावरुन दिवसातून चार फेºया सुरु कराव्या. जेणे करुन या भागातील प्रवाशांना सरळ गोंदियापर्यंत जाता येईल व एसटी महामंडळाची आर्थिक आवकही वाढेल.
या संदर्भात या क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले तसेच जि.प.क्षेत्राचे सदस्य यांना नागरिकांना निवेदन दिले आहे. सदर गावातील ग्रामपंचायतद्वारे ग्रामसभेचे ठरावसुद्धा पाठविण्यात आले आहे. एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी ही मागील अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. या संदर्भात एसटी विभाग गोंदिया यांनीसुद्धा या मार्गाची चौकशी करुन बस सुरू करण्यात येईल, असे पत्राद्वारे अनेक दिवसांपूर्वी कळविले होते.
परंतु अद्याप या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली नाही. अनेक लोकप्रतिनिधींनीसुद्धा यासाठी पाठपुरावा केला असल्याचे सांगतात. परंतु याकडे एसटी महामंडळ गोंदिया का लक्ष देत नाही, हे कळण्यास मार्ग नाही. तरी या भागातील प्रवाशांची समस्या लक्षात घेवून गोंदिया-धापेवाडा-सावरा (पिपरीया) मार्गावर एसटी बस सुरू करण्याची मागणी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केली आहे.

Web Title: Get started from Gondia to Pipariya via Dhapewada bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.