राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती मिळवा एका ॲपवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 05:17 PM2024-12-06T17:17:28+5:302024-12-06T17:18:46+5:30
Gondia : दहावी-बारावीचे टेन्शन सोडा; ॲप डाउनलोड करा
गोंदिया : केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधांसाठी मंडळाने मोबाइल ॲप विकसित केले असून बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थीपालक, शाळा, कर्मचारी यांना उपयुक्त असे ॲप आहे. त्यामुळे हे ॲप डाऊनलोड करून दहावी बारावीचे टेन्शन सोडा, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 'एमएसबीएसएचएसई' ॲपची निर्मिती केली आहे. याचा लाभ शिक्षक, विद्यार्थी, पालकांसाठी होणार आहे.
'एमएसबीएसएचएसई' ॲपची वैशिष्ट्ये काय?
- ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकाल यासह अनुषंगिक बाबी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
- फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह अनुषंगिक सुविधा शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
- अन्य नवीनतम अद्ययावत सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगिनशिवाय उपलब्ध करून दिली आहे.
मॉडेल प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येणार
शिक्षण मंडळाने तयार केलेले ॲप हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी उपयुक्त आहे. या ॲपवर मॉडेल प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत. या प्रश्नपत्रिका विद्यार्थी डाउनलोड करू शकतात.
टाइमटेबल, नोटिफिकेशन्स वेळोवेळी मिळणार
हे ॲप तुम्हाला परीक्षेचे वेळापत्रक, गुणपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका, झटपट निकाल, फी परतावा, अंतर्गत आणि व्यावहारिक गुण आणि इतर उपयुक्त सूचना आणि अपडेट्समध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते.
अँप कसे डाउनलोड करायचे?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 'एमएसबीएसएचएसई' ॲपची निर्मिती केली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आहे. त्यांनतर आपली संपूर्ण माहिती भरून ॲप सुरू करायचे आहे.