कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लस घ्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:02+5:302021-05-19T04:30:02+5:30
बाराभाटी : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सर्व ४५ वर्षांच्या वयोगटातील नागरिकांनी जिवाला धोका होऊ नये म्हणून लस घेणे आवश्यक ...
बाराभाटी :
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सर्व ४५ वर्षांच्या वयोगटातील नागरिकांनी जिवाला धोका होऊ नये म्हणून लस घेणे आवश्यक आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घ्यावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लस घेणाऱ्या नागरिकाला काही होत नाही, लस घेणे हेच आपले सुरक्षा कवच आहे. लसीकरणाला घाबरू नये, संरक्षणासाठीच लस आहे, नाही तर कोरोनाच्या उपचारासाठी भरपूर रक्कम मोजावी लागते. प्रत्येकाला जिवाची काळजी असेल तर लस घेतलीच पाहिजे, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
यावेळी ४५ च्या वर नागरिकांसाठी सुरू आहे. तरी नागरिकांनी पुढे येत लसीकरण करून घ्यावे.
......कोट
आतापर्यंत ६५ ते ७० टक्के लसीकरण झाले आही. लस पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी ४५ वयोगटावरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.
-डाॅ. अंबर मडावी,
वैद्यकीय अधिकारी,
आयुर्वेदिक दवाखाना, बाराभाटी