भूत, भानामती, जादू अस्तित्वात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 09:28 PM2017-10-01T21:28:48+5:302017-10-01T21:29:44+5:30

वैज्ञानिक दृष्टिकोणातून माणसाने वागावे. जगात जादूने काहीही करता येत नाही. बाबा लोक नारळ व लिंबूचा वापर करून भूत उतरविण्याचे काम करीत असल्याचे भासवतात.

 Ghosts, Banamati, Magic does not exist | भूत, भानामती, जादू अस्तित्वात नाही

भूत, भानामती, जादू अस्तित्वात नाही

Next
ठळक मुद्देप्रकाश धोटे : घाटकुरोडा येथे शारदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : वैज्ञानिक दृष्टिकोणातून माणसाने वागावे. जगात जादूने काहीही करता येत नाही. बाबा लोक नारळ व लिंबूचा वापर करून भूत उतरविण्याचे काम करीत असल्याचे भासवतात. परंतु जगात भूत, भानामती व जादू अस्तित्वात नाही, प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांनी केले.
ते घाटकुरोडा येथील महिला शारदा उत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे होते. अतिथी म्हणून तालुका संघटक डी.आर. गिरीपुंजे, जेष्ठ कार्यकर्ते फ.रा. काटवले, एस. बांते उपस्थित होते.
या वेळी प्रा. प्रकाश धोटे यांनी लिंबातून रक्त काढणे, चुन्याचा गुलाल बनविणे, कानाने चिठ्ठ्या वाचणे, पाण्याने दिवा पेटविणे असे अनेक वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले. तर डी.आर. गिरीपुंजे यांनी जादूटोण्याच्या संशयावरून पीडित लोकांची सुटका कशी केली, भूत कसे नसतात याचे स्वत: घेतलेले अनुभव व्यक्त केले. तसेच काटवले यांनी नारळातून विविध वस्तू काढणे, अशा विविध प्रयोगातून मार्गदर्शन केले. संचालन शैलेश खंगार यांनी केले. प्रास्ताविक राहुल डोंगरवार यांनी मांडले. आभार पप्पू मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी मंडळाच्या अध्यक्ष गीता मेश्राम, शांता मेश्राम, शामलता मेश्राम, संजय खंगार, प्रेमलाल उकेटेके, राकेश खंगार, स्वप्नील खंगार, अंकित मेश्राम, रविंद्र खंगार, संतोष खंगार, राकेश भेलावे, सचिन खंगार यांनी सहकार्य केले.

Web Title:  Ghosts, Banamati, Magic does not exist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.