वाचनालयाला दिली ३० हजारांच्या पुस्तकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 09:57 PM2018-07-02T21:57:05+5:302018-07-02T21:57:21+5:30

समाज सुधारकांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होवून व शिक्षित जन्मदात्यांच्या सुसंस्कारात वाढलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत उद्याचे भाग्यविधाता घडविणारी मेघा रामजी राऊत यांनी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या वाचनालयाला ३० हजारांचे विविध स्पर्धा परीक्षांच्या पुस्तक व इतर साहित्य दान दिले.

A gift of 30 thousand books given to the library | वाचनालयाला दिली ३० हजारांच्या पुस्तकांची भेट

वाचनालयाला दिली ३० हजारांच्या पुस्तकांची भेट

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस ठाण्याचे वाचनालय : जि.प. शिक्षिका ‘मेघा राऊत’ यांनी जपली सामाजिक बांधिलकी

अमरचंद ठवरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : समाज सुधारकांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होवून व शिक्षित जन्मदात्यांच्या सुसंस्कारात वाढलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत उद्याचे भाग्यविधाता घडविणारी मेघा रामजी राऊत यांनी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या वाचनालयाला ३० हजारांचे विविध स्पर्धा परीक्षांच्या पुस्तक व इतर साहित्य दान दिले. उल्लेखनिय म्हणजे सदर साहित्यांचे दान स्वत:च्या लग्नाच्या दिवशी केले. शिक्षिकेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा आगळा-वेगळा उपक्रमच राबविला.
समाजात जीवन जगत असताना प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या स्वरुपात दान करतो. दानाचे विविध प्रकार आहेत. आजघडीला सर्वत्र ‘गुप्त’ दान मोठ्या प्रमाणात केले जाते. जेथे ज्ञानाचा सागर संचित करुन इतरांची वैचारिक भूक भागविल्या जाते. त्या चार भिंतीच्या आड असलेल्या ग्रंथालयाला, वाचनालयाला दिलेला दान हाच खरा परोपकारी ठरणारा आहे. वाचनालयामुळे भविष्यात होणाऱ्या फायद्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे जीवन फुलते, हाच आशावाद अंगी बाळगून शिक्षिका मेघा यांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रगल्भ विचारांचा पगडा मेघा राऊत यांच्यावर सुरूवातीपासूनच आहे.
तुमच्याकडे १० रुपये असतील तर ५ रुपयामध्ये आपली गरज भागवा व उर्वरित ५ रुपयातून आपल्या मुलाबाळांसाठी पुस्तका विकत घ्या, असा मौलीक संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर देत असत. जो वाचणार नाही तो वाचू शकत नाही. या विचारांचा तंतोतंत अंगिकार शिक्षिका राऊत यांनी केला आहे. मेघा यांचा अर्जुनी मोरगाव येथे अलीकडेच मंगल परिणय सामाजिक रितीरिवाजाने, कोणताही बडेजाव न करता शालिनतापूर्वक यश साखरे यांच्याशी पार पडला.
या परिणय सोहळ्याची आठवण तसेच वडील स्मृतिशेष रामजी राऊत यांच्या स्मरणार्थ पोलीस ठाण्याच्या वाचनालयाला विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके एकूण ७३ जवळपास २० हजार रूपये किंमतीचे तसेच युवकांना पुस्तकांचे वाचन करताना उष्णतेचा त्रास जाणवू नये, यासाठी दहा हजार रुपये किंमतीची एक कुलर दान दिले. या सर्व साहित्यांचा स्वीकार ठाणेदार शिवराम कुंभरे यांनी केला.
उदारमनाने वाचनालयाला ज्ञान भंडार देणाºया नवदाम्पत्यांना त्यांच्या मंगल परिणय दिनी पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांच्या हस्ते गौरव करुन व वाचनालयातील अभ्यासकांकडून भेट वस्तू देवून वैवाहिक जीवनाच्या मंगलकामना करण्यात आल्या. मेघाच्या अभिनव उपक्रमाचे सर्व पोलीस कर्मचारी, वाचनालयात ज्ञानार्जन करणारे युवक तसेच प्रतिष्ठित नागरिक प्रशंसा करीत आहेत.

Web Title: A gift of 30 thousand books given to the library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.