पोलीस दलातील मुली समाजाच्या गौरव

By admin | Published: February 4, 2017 01:36 AM2017-02-04T01:36:56+5:302017-02-04T01:36:56+5:30

एकेकाळी पोलीस विभागात काम करणे समाजात असभ्य मानले जात होते व समाजातील मुली पोलीस विभागात काम करीत होत्या

Girls' Gala from the police force | पोलीस दलातील मुली समाजाच्या गौरव

पोलीस दलातील मुली समाजाच्या गौरव

Next

येसूलाल उपराडे : लोधी मिलन समारंभ व गुणवंतांचा सत्कार समारंभ
आमगाव : एकेकाळी पोलीस विभागात काम करणे समाजात असभ्य मानले जात होते व समाजातील मुली पोलीस विभागात काम करीत होत्या त्यांना हीन भावनेतून बघितले जात होते. मात्र या विचारांना बदलून लोधी समाजातील मुलींनी पुरोगामी विकासपूर्ण विचारांना जन्म दिला. आज समाजातील १७ मुली पोलीस दलात कार्यरत असून या मुली समाजाचे गौरव असल्याचे प्रतिपादन लोधी शक्ती संघटनचे प्रमुख अ‍ॅड. येसूलाल उपराडे यांनी केले.
लोधी शक्ती संघटनेच्यावतीने आयोजीत लोधी मिलन समारंभ, परिचय संमेलन व गौरव पुरस्कार वितरण समांरभात ते बोलत होते. उद्घाटन जल संसाधन विभागाचे विशेष कायार्धिकारी लोकेश लिल्हारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंग नागपूरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय पुराम, माजी सभापती यादनलाल बनोटे, खेमराज लिल्हारे, जिल्हा परिषद सभापती छाया दसरे, जि.प.सदस्य कुंदन कटारे, कमलेश्वरी लिल्हारे, पं.स.सदस्य भरत लिल्हारे, प्रमिला दसरीया व नगरसेविका अ‍ॅड. हेमलता पतेह उपस्थित होते.
या कार्यक्रमात समाजातील विवाह योग्य मुला-मुलींचा ओळख कार्यक्रम घेण्यात आला व त्यात ४० उप वर वधूंनी भाग घेतला. याप्रसंगी साहेबलाल दसहरे, कविता ठकरेले, शिवाणी लोधी, लेकसिंग मस्करे व नेहा लिल्हारे यांनी कविता वाचन केले. तर देवेंद्र नागपूरे व कमल सुलाखे यांनी अवंतीबाईंच्या गाथांचे सुमधूर गायन सादर केले. पश्चात समाजातील मुला-मुलींनी नृत्य सादर केले. संचालन नूतन दमाहे, महेंद्र कुराहे, चरण डहारे यांनी केले. आभार दिलीप बनोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दयाल डहारे, येवक उपराडे, रंजीत मच्छीरके, ओंकार लिल्हारे, हेमंत बनोटे, तिलकचंद लिल्हारे, किशोर बल्हारे, राजकुमार बसोने, राजकुमार नागपूरे, कोमल लिल्हारे, सतीष दमाहे, प्रकाश दमाहे, संजय नागपूरे व समाजबांधवांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Girls' Gala from the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.