दहावीच्या निकालात मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:31 PM2019-05-06T22:31:02+5:302019-05-06T22:31:18+5:30
सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. येथील सेंट झेवीयर्स स्कूलने जिल्ह्यातील टॉपर देत प्रथम पाच टॉपर मध्ये स्थान मिळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. येथील सेंट झेवीयर्स स्कूलने जिल्ह्यातील टॉपर देत प्रथम पाच टॉपर मध्ये स्थान मिळविले आहे.
जिल्ह्यातून प्रथम क्रमांक सेंट झेवियर्स स्कूलमधील विद्यार्थिनी ऐश्वर्या खोब्रागडे हिने ९७.८० टक्के गुण मिळवून पटकाविला. द्वितीय क्रमांक दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी वरूण कश्यप याने ९७.६० टक्के गुण घेऊन पटकाविला. तृतीय क्रमांक सेंट झेवियर्स स्कूलची विद्यार्थिनी अरूंदा मेश्राम हिने ९७.४० टक्के गुण घेऊन, चतुर्थ क्रमांक सेंट झेवियर्स स्कूलमधील विद्यार्थिनी तृप्ती बावनकर तसेच प्रोग्रेसिव्ह स्कूलमधील विद्यार्थी प्रथम चौधरी यांनी ९७ टक्के गुण घेवून पटकाविला.
तर जिल्ह्यातून पाचवा क्रमांक गोंदिया पब्लिक स्कूलचा विद्यार्थी प्रज्योत उपाध्ये याच्यासह सेंट झेवियर्स स्कूलमधील विद्यार्थिनी श्रृती बावनकर व एल्सा लालानी यांनी ९६.४० टक्के गुण घेऊन पटकाविला आहे.