मुलींनी आत्मनिर्भर व्हावे- रहांगडाले

By admin | Published: January 14, 2015 11:11 PM2015-01-14T23:11:32+5:302015-01-14T23:11:32+5:30

आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती व समाजोपयोगी कार्य करण्याची इच्छा असली तर निश्चितपणे ध्येय गाठता येते. तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रीशक्तीने आत्मनिर्भर असणे ही महत्वाची बाब आहे,

Girls should be self-reliant - Rahangdale | मुलींनी आत्मनिर्भर व्हावे- रहांगडाले

मुलींनी आत्मनिर्भर व्हावे- रहांगडाले

Next

गोंदिया : आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती व समाजोपयोगी कार्य करण्याची इच्छा असली तर निश्चितपणे ध्येय गाठता येते. तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रीशक्तीने आत्मनिर्भर असणे ही महत्वाची बाब आहे, असे मत सोनी जि.प. सदस्य सीता रहांगडाले यांनी व्यक्त केले.
फुलचूर हायस्कूल येथे तीन दिवसीय स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करता होत्या. उद्घाटन संस्था सचिव किसनसिंह बैस, उपाध्यक्ष पी.डी. शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मंचावर जि.प. सदस्य सीता रहांगडाले, जि.प. सदस्य राजेश चतुर, पंचायत फुलचूर लक्ष्मी निर्वीकार, शिक्षक प्रतिनिधी पी.के. बिसेन, के.सी. नागपूरे, कविता हरडे, अनिल सुर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
जि.प. सदस्य रहांगडाले यांनी तंत्रज्ञानाच्या युगात, मोबाईल, इंटरनेटचा उपयोग शैक्षणिक कामासाठीच वापरण्याचा सल्ला दिला. जि.प. सदस्य राजेश चतूर यांनी ही या युगात टिकून राहण्यासाठी परिश्रम चिकाटी असावी असे मत प्रदर्शित केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक एन.एस. श्रीभद्रे यांनी तर अहवाल वाचन वार्षिकोत्सव प्रभारी ओ.जे. कटरे यांनी केले. यावेळी पुष्पसजावट, प्रश्नमंच, स्वयंस्फुर्त भाषण आदि वैद्धिक कार्यक्रम घेण्यात आले. रांगोळीतूनही वनसंवर्धन, पाणी वाचवा इत्यादी संदेश देण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात स्त्रीभ्रुण हत्या, अंधश्रद्धा, साक्षरता, स्वच्छता अभियानावर एकांकिका सादर करण्यात आली. संचालन जी.के. पारधी व आभार प्रदर्शन धामणकर, ओ.जे. कटरे यांनी केले. स्नेहसंमेलनासाठी सांस्कृतिक प्रभारी एस.डी.भंडारकर व एस.एस. यादव क्रींडा प्रभारी, बौद्धिक प्रभारी, शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Girls should be self-reliant - Rahangdale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.