शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १८ हजार मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 09:00 PM2019-03-14T21:00:36+5:302019-03-14T21:01:52+5:30
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रती माह १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा लागू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) च्या नवेगावबांध येथे पार पडलेल्या अधिवेशनात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रती माह १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा लागू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) च्या नवेगावबांध येथे पार पडलेल्या अधिवेशनात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) चे जिल्हा अधिवेशन रविवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पार पडले. अध्यक्षस्थानी ललीता राऊत होत्या.
या वेळी युनियनचे राज्य उपाध्यक्ष शिवकुमार गणविर, आयटकचे जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे मिलिंद गणविर, सहसचिव सुनील गणविर, नुरखा पठान, रंजिकिरण मेश्राम, अशोक बागडे उपस्थित होते.
सचिव करूणा गणविर यांनी कामगारांची स्थिती, कार्यस्थळावर अतिरिक्त कामे, आर्थिक शोषण, मानधन व जिल्हा युनियनच्या संघटनात्मक स्थितीचा अहवाल सादर केला. शालेय पोषण आहार कर्मचाºयांना १८ हजार रुपये मानधन, पेशंन आणि इतर सोयी सुविधा देण्यात याव्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती शिवकुमार गवविर यांनी दिली.
राज्य सरकारने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५०० रुपयांची तुटपुंजी मानधन वाढ केली याचा या वेळी निषेध करण्यात आला. राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये वाढीव मानधन देण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या शेवटी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थानी ललिता राऊत, कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष ओमेश्वरी पटले, उपाध्यक्ष अशोक बागडे, सचिव करुणा गणविर, सहसचिव रेखा मेश्राम, गिता नागोसे, मिलिंद गणविर, कोषाध्यक्ष धन्नू उईके, सदस्य रमेश पाटणकर, जिवन पुणेकर, ललिता कवरे, धनवंता कोहळे, कविता किरणापूरे, मंगला ठाकरे यांची निवड करण्यात आली.