कोरोना योद्धा म्हणून शिक्षकांना ५० लाख विमा संरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:12+5:302021-04-20T04:30:12+5:30

गोंदिया : कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरू आहे. त्यासाठी काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ...

Give 5 million insurance cover to teachers as Corona Warriors | कोरोना योद्धा म्हणून शिक्षकांना ५० लाख विमा संरक्षण द्या

कोरोना योद्धा म्हणून शिक्षकांना ५० लाख विमा संरक्षण द्या

Next

गोंदिया : कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरू आहे. त्यासाठी काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तेवढे संरक्षण आम्हालाही देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शासन निर्णयानुसार कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य कर्मचारी, रोजंदारी कंत्राटी मानसेवी असे सर्व कर्मचारी अशा सर्व घटकांना ५० लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र, यात शिक्षकांचा समावेश नाही. या कार्यामध्ये राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात गावातील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, कंटेन्मेंट झोनमधील गावातील चेक पोस्टचे काम, प्रमुख रस्त्यावर पोस्टचे काम, लसीकरण केंद्रावर लसीकरणाच्या नोंदीचे काम, रेशन दुकानावर वाटपासाठी मदत करणे, वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये विविध संकलन करणे, जागृतीचे काम करणे इत्यादी कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्तव्य पार पाडताना काही शिक्षकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे त्याचे कुटुंब पोरके झाले आहे. त्यांचा आधार हरवल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. कोरोना विरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्धा शिक्षकांनादेखील ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजीत पवार यांना केली आहे. मागणी करणारे पत्र शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे, गोंदिया जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरडे, प्रमेश बिसेन, गुलाब मौंदेकर, पी. डी. चव्हाण, संतोष डोंगरे, विलास डोंगरे, संतोष बारेवार, नलिनी नागरीकर, ममता चुटे, एम. झेड नांदगाये, संतोष कुसराम, संतोष मेंढे, राजू बारसे, नरेश कोरे, एम. एस. बिसेन, आनंद सोनवाने, रामभगत पाचे, जसपाल चक्रेल, डी. एस. रामटेके, राजू टेभंरे, पी. एस. रहांगडाले, विजय मेश्राम, रमेश सोनवणे, व्ही. डी. भांडारकर, गणेश शिवनकर, किशोर बहेकार यांनी केली आहे.

Web Title: Give 5 million insurance cover to teachers as Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.