पीक नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्यांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:24 AM2021-07-25T04:24:18+5:302021-07-25T04:24:18+5:30
गोंदिया : खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक ...
गोंदिया : खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना राज्यात राबविली जात आहे. या
योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन,
विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक
आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. अशात शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्यांना नुकसान झाल्यापासून ७२ तासांंमध्ये द्यायची आहे.
जुलै महिन्यात राज्यातील काही भागात अतिवृष्टी तसेच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेत
पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीकविमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे वरील बाबींमुळे
नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान
झाल्यापासून ७२ तासांमध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत क्रॉप इंश्युरन्स ॲप संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक,बँक, कृषी व महसूल विभागांना कळविणे गरजेचे आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येईल.