जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:24+5:30
राज्यात नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मरण पावलेल्या कर्मचाºयांना सदर नवीन निवृत्तीवेतन योजना लाभाची नसल्याने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुनी निवृत्तीवेतन योजना १९७२ चा लाभ देण्याबाबत ५ मे २००९ रोजी शासन निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असूनही राज्य शासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. करिता त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात यावे या मागणीचे निवेदन जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना देण्यात आले.
राज्यात नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना सदर नवीन निवृत्तीवेतन योजना लाभाची नसल्याने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुनी निवृत्तीवेतन योजना १९७२ चा लाभ देण्याबाबत ५ मे २००९ रोजी शासन निर्णय घेण्यात आला. परंतु राज्य शासनाने अद्याप या शासन निर्णयानुसार मृत कुटुंबियांच्या परिवारांना पेन्शनचा लाभ देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच नवीन पेन्शन योजना लागू केल्यापासून मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्यात आलेला नाही. यावर सरकारचे लक्ष वेधण्यात यावे यासंबंधी निवेदन नवीन पेन्शन हक्क संघटनेच्या सदस्यांनी आमदार विजय रहांगडाले यांना दिले.
यावेळी संघटना अध्यक्ष संतोष रहांगडाले, संचालक पी.टी.रंगारी, संजय बोपचे, तारेन्द्र ठाकरे, अशोक बिसेन, रवींद्र भगत, मुकेश रहांगडाले, प्रवीण चौधरी, नितीन वादिचोर, प्रदीप धनवटे, राजेश जंजाळ व अन्य उपस्थित होते.