लायसन्स असेल तरच द्या मुलांना गाडी; अन्यथा पालकांना होईल कोर्टाची वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 02:27 PM2024-05-24T14:27:29+5:302024-05-24T14:28:45+5:30

बुंगाट 'धूम मचाले' पडेल महागात : कठोर कारवाई, आरटीओ, पोलिस प्रशासनाचा इशारा

Give children a car only if they have a license; Otherwise the parents will go to court | लायसन्स असेल तरच द्या मुलांना गाडी; अन्यथा पालकांना होईल कोर्टाची वारी

Give children a car only if they have a license; Otherwise the parents will go to court

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
शहर-जिल्ह्याची वाढलेली लोकसंख्या आणि तेवढ्याच प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ आहे. नुकतीच पुण्यामध्ये नशेत कार चालवल्याने दोघांना जीव गमवावा लागला. या धर्तीवर गोंदिया आरटीओ, पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. १८ वयाच्या आत असलेल्या मुलांच्या हाती गाडीची चावी द्याल तर पालकांवर गुन्हा दाखल होऊन कोर्टाची पायरी चढावी लागेल, असा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहरातील कल्याणनगर भागात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने कार चालवून दोघांना उडवल्याने दोघा अभियंत्यांचा हकनाक बळी गेला. गोंदिया शहरातही मिसरुड न फुटलेली तरणी पोरं बाइकच्या अक्सिलेटरचा रेस वाढवून सुसाट वाहन पळवतात. कोणाची तमा न बाळगता वाहन पळवण्यामुळे अपघात घडताहेत. वाहने चालवणारी अल्पवयीन मुले असतील त्यांना कायद्यान्वये दंड तर होताच मात्र अपघातात एखाद्याला जीव गमावला तर संबंधित अल्पवयीन मुलाच्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल होतो. कारवाई होऊन गुन्हा दाखल होता.


हे प्रकरण न्यायालयात जाऊन कठोर कारवाईही होऊ शकते. पोलिस व आरटीओ प्रशासनाने पुण्याच्या घटनेची दखल घेत पालकांनी सतर्क राहत चुकूनही आपल्या मुलांच्या हाती वाहनाची चावी देऊ नये असे आवाहन केले आहे.

 
चार महिन्यांत ८५ जीवघेण्या अपघातात ३७ जणांचा बळी
जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ या गेल्या चार महिन्यांमध्ये विविध प्रकारचे दुचाकीसह चारचाकीचे असे एकूण १८५ अपघात झाले आहेत.
बाइकद्वारे झालेल्या जीवघेण्या अपघाताची संख्या ८२ असून, त्यामध्ये ३७ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक आकडेवारी वाहतूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.


बेफिकीरपणे वाहन चालवण्यामुळे अपघातांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात वाहन परवाना नसलेल्या अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नका अन्यथा त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. नाहक आर्थिक व मानसिक त्रास होतो. यावर सर्वांनीच सतर्क राहावे.
- राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,

मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुले बाइक चालवताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. शिवाय गुन्ह्याचे स्वरूप पाहून संबंधित पालकांवर गुन्हे दाखल होऊन कायद्यानुसार शिक्षाही होऊ शकते.
- किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण विभाग
 

Web Title: Give children a car only if they have a license; Otherwise the parents will go to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.