शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 09:15 PM2017-09-26T21:15:52+5:302017-09-26T21:16:05+5:30

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.

Give comprehensive debt relief to farmers | शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या

Next
ठळक मुद्देतालुका काँग्रेसची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंबंधीचे निवेदन कमिटीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार संजय रामटेके यांना देण्यात आले.
यंदा हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजावरुन (आकडेवारी) वरुन शेतकºयांनी आपल्या शेतामध्ये धानाचे पºहे लवकर टाकले. मात्र हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज खोटे ठरल्याने शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी काही ठिकाणी अजूनपर्यंत रोवणी झाली नाही. ज्यांनी धानाची रोवणी केली, त्या धानाला वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. यंदा पाऊस पडला नाही. तलाव, नाले, बोडी सुध्दा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे सर्व तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांसमोर जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, बेरोजगारी समस्या निर्माण झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी हवालदिल आहे. यंदा जिल्ह्यामध्ये २ लाख हेक्टर शेतीमध्ये धान रोवणी केली. १० लाख शेतकरी व शेतमजूर शेतीवर अवलंबून आहेत.
यंदा पाऊस कमी आल्यापासून शेतकºयांने आपल्या शेतामध्ये धानाची रोवणी कमी प्रमाण केली आहे. जे धान लावले त्यांना जिवंत ठेवणे कठीण झाले आहे. मागील महिन्यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण आतापर्यंत शेतकºयांचे कर्जमाफ झाले नाही. थकीत शेतकºयांना १० हजार रुपये अग्रीम म्हणून जाहीर केले. पण १० हजार रुपये अग्रीम राशी बँकांनी शेतकºयांना दिली नाही. जिल्ह्यातील लाखो शेतकरी पिकविम्या पासून वंचीत राहिले. शासनाने पिकविम्या आॅनलाईन करण्यासाठी शेतकºयांना रांगेमध्ये उभे करुन शेतकºयांनी थट्टा केली आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याला दुष्काळ घोषीत करुन शेतकºयांना त्वरीत मदत देण्याचे आदेश सरकारनी द्यावे, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांवर बँकेचे कर्ज असून त्या कर्जवसुली स्थगिती द्यावी, शेतकºयांकडून कर वसूली करु नये, पाणी पट्टी व शासकीय कराची वसूली थांबवावी, महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीची पाहता शेतकºयांना प्रती हेक्टर ३० हजार रुपये अनुदान द्यावे, शेतकºयांना वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा, शेतकºयांचे कृषी पंपाचे विद्युत देयक माफ करुन वीज पुरवठा खंडीत करु नये, ज्या शेतकºयांचे विद्युत पुरवठा खंडीत झाले त्यांची जोडणी करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमत कमी करण्यात याव्या, आदि मागण्या या वेळी दिलेल्या निवेदनातून केल्या. शिष्टमंडळात तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांचा समावेश होता.

Web Title: Give comprehensive debt relief to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.