शुक्रवारपर्यंत पीक विमा संमतीपत्र द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:34+5:302021-07-08T04:19:34+5:30
गोंदिया : प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहन कृषी विभागामार्फत ...
गोंदिया : प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेमध्ये सहभागाची अंतिम तारीख १५ जुलैपर्यंत असली तरी कर्जदार शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत (दि.९) बँकेत जाऊन स्वत:चे घोषणापत्र व संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन २०२१-२२ वर्षासाठी राबविण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रचार-प्रसिध्दी करण्यात येत आहे. जिल्ह्यात फक्त धान पीक अधिसूचित असून त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहभागासाठी बँक, कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँक, आपले सरकार सेवा केंद्र व विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्यामार्फत विमा हप्ता भरता येईल. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत (दि.९) बँकेत जाऊन स्वत:चे घोषणापत्र व संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.