डॉक्टर द्या, अन्यथा दवाखाना बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:59 AM2018-10-14T00:59:03+5:302018-10-14T01:00:00+5:30
गावात आयुर्वेदिक दवाखाना आहे. परंतु दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही. त्यामुळे दवाखाना वाºयावर सुरू आहे. आम्हाला डॉक्टर द्या, अन्यथा दवाखाना बंद करा, असा संताप नागरिकांनी आरोग्य विभागावर व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : गावात आयुर्वेदिक दवाखाना आहे. परंतु दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही. त्यामुळे दवाखाना वाºयावर सुरू आहे. आम्हाला डॉक्टर द्या, अन्यथा दवाखाना बंद करा, असा संताप नागरिकांनी आरोग्य विभागावर व्यक्त केला आहे.
सदर दवाखाना हा गोठणगाव प्राथमिक केंद्रांतर्गत येतो. पण गोठणगाव केंद्राचा सुद्धा कारभार समाधानकारक सुरू नाही. येथील दवाखाना सुरळीत सुरु होता. मात्र येथील डॉ. कुलदीप बघेले १६ आॅगस्टला बदली झाली. तेव्हापासून दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी डॉक्टरविनाच कारभार सुरू आहे. डॉक्टरची नियुक्ती न केल्याने हा दवाखाना परिसरातील रुग्णांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. दवाखान्यात कोणतेही उपचार होत नाही. शिपाई आहे तो फक्त दवाखाना उघडतो व आपली नोकरी म्हणून दवाखान्यात बसतो. मात्र उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागते.
येथील डॉक्टरची बदली झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. सदर डॉक्टरची बदली रद्द करुन पुन्हा त्यांचीच नियुक्ती करण्याची मागणी आहे. अन्यथा दवाखान्याला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. आठ दिवसांत डॉक्टरची नियुक्ती व औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.डी.निमगडे यांनी दिले होत. मात्र याला पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्यासाठी समोर येत नाही. फक्त उद्घाटन, भूमिपूजन करण्यासाठीच येतात. त्यामुळे परिसरातील बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, कवढा, डोंगरगाव, ब्राम्हणटोला, सुकळी येथील गावकऱ्यांमध्ये रोष आहे.
सुविधांचा अभाव
या आयुर्वेदिक दवाखान्यात सायरप नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही, पाण्याची सुविधा नाही. अनेक वर्षांपासून पाण्याची मोटार बंद आहे. प्राथमिक उपचाराच्या सुध्दा गोळ्या औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.
मागील आठवड्यात डॉक्टरांची नियुक्ती झाली असती पण डॉक्टरांचा तुडवडा आहे. मी डॉक्टर पाठविण्याच्या तयारीत आहे. लवकरच डॉक्टरांची सोय केली जाईल.
डॉ.एस.डी. निमगडे
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया