चांदाफोर्ट गाडीला डबल इंजीन द्या

By admin | Published: June 21, 2015 01:12 AM2015-06-21T01:12:24+5:302015-06-21T01:12:24+5:30

गोंदिया- चांदाफोर्ट रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे गाडीला उशीर होतो.

Give double car to Chandaufort train | चांदाफोर्ट गाडीला डबल इंजीन द्या

चांदाफोर्ट गाडीला डबल इंजीन द्या

Next

प्रवाशांची मागणी : दिवसातून तीन वेळा इंजन होते बंद
बाराभाटी : गोंदिया- चांदाफोर्ट रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे गाडीला उशीर होतो. नेहमीच होत असलेला हा प्रकार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या गाडीला डबल इंजीन द्यावे अशी मागणी या गाडीतून प्रवास करणारे नागरिक करीत आहेत.
चांदाफोर्ट-गोंदिया दरम्यान मोठ्या प्रमाणात शासकीय व निमशासकीय कर्मचारी, व्यापारी व विद्यार्थीही दररोजचा प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास अत्यंत सुरक्षित व सोयीस्कर मानला जात असल्याने या सर्वांना गोंदिया-चांदाफोर्ट ही गाडी एक वरदानच ठरली आहे.
क्वचितच रेल्वे उशीर करते, त्यामुळे गाडीवर विश्वास ठेवूनच कर्मचारी व विद्यार्थी या गाडीतून प्रवास करतात. मात्र या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड येऊन गाडी उशिरा पोहचत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे मात्र कर्मचारी कार्यालयात तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांत उशिरा पोहचून त्यांचे नुकसान होत आहे.
गाडीत घडत चाललेल्या या प्रकाराकडे मात्र रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मात्र याचा त्रास या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भोगावा लागत आहे. वारंवारचा हा प्रकार आता प्रवाशांना असह्य होत असल्याने या गाडीला डबल इंजिन लावण्यात यावे अशी मागणी प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे करीत आहेत. (प्रतिनिधी)
बुधवारी (दि.१७) चांदाफोर्ट वरुन सायंकाळी ३ वाजता सुटणारी रेल्वे ३ वेळा प्रवासादरम्यान बंद पडली. ही गाडी ६ वाजता पोहोचायला हवी होती मात्र रात्री १२ वाजता पोहोचली. त्यामुळे बुधवारचा प्रवास प्रवाशांसाठी अत्यधीक दगदगीचा व अविस्मरणीय ठरला आहे. आता भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता या गाडीला डबल इंजन लावावे अशी मागणी गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.

Web Title: Give double car to Chandaufort train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.