शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:31 PM2017-08-23T23:31:42+5:302017-08-23T23:32:09+5:30
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्याचा दौरा करुन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी धान पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. जलाशयांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा असून दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर असून अशा स्थिती शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. हीच बाब हेरून आ.अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेता डॉ.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. ५० टक्के झालेल्या रोवण्या संकटात आल्या आहे. तर ५० टक्के रोवणी शिल्लक असून पाऊस न झाल्याने ती देखील वाळत चालली आहे. शेतकºयांनी मोठ्या आशेने व पैशाची जुळवाजुळव करुन खरीपाची तयारी केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून त्याचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली. तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये या प्रमाणे आर्थिक मदत देण्याची मागणी अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांवर गांर्भीयाने विचार व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ.अग्रवाल यांना दिले.
उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा सुरळीत करा
पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजनाचा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच थकीत वीज देयकामुळे खंडीत केलेला कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली.
शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज द्या
सरकारने थकबाकीदार शेतकºयांना १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज उपलब्ध करुन दिले. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्ज आणि कर वसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली.