गुरव समाजाला आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:39+5:302021-05-11T04:30:39+5:30
सडक-अर्जुनी : लॉकडाऊन कालावधीत सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरात पूजा-अर्चना करणाऱ्या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले असून त्यांच्यावर ...
सडक-अर्जुनी : लॉकडाऊन कालावधीत सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरात पूजा-अर्चना करणाऱ्या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिराच्या देखरेखीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी गुरव क्रांती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अश्लेष माडे यांनी यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्रात ३५ लाखांहून जास्त बलुतेदार गुरव समाजाची लोकसंख्या आहे. त्यांचा पारंपरिक उदरनिर्वहाचा मार्ग ग्रामदेवतांची पूजा-अर्चना, साफसफाई, दिवाबत्ती करणे हा आहे. या मंदिराची पूजा-अर्चना साफसफाई, दिवाबत्ती करून भाविकांकडून मिळणाऱ्या दक्षिणेतून व बलुतेदार पद्धतीने गावातून मिळणाऱ्या शिधा यातून बलुतेदार गुरव समाजाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु तीन महिन्यांपासून यातून मिळणारे उत्पन्नदेखील पूर्ण बंद आहे. दरम्यान, आर्थिक अडचणीत सापडलेल्या गुरव समाजाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी अश्लेष पांडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार उषा चौधरी यांना दिले आहे.