वारकरी कलावंताना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:29 AM2021-09-03T04:29:41+5:302021-09-03T04:29:41+5:30

बोंडगावदेवी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, टाळकरी ...

Give financial help to Warkari artists | वारकरी कलावंताना आर्थिक मदत द्या

वारकरी कलावंताना आर्थिक मदत द्या

Next

बोंडगावदेवी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, टाळकरी अशा विविध कलावंतांना शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केली आहे. वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने तहसीलदारांना गुरुवारी (दि.२) निवेदन देण्यात आले.

देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट ओढावले आहे. सततच्या लाॅकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजूर, लहान उद्योग-व्यावसायिक तसेच कलावंतांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लाॅकडाऊनमुळे समाजातील सर्वच घटकातील लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याचा फटका वारकरी संप्रदायातील विविध कलावंतांनाही बसला आहे. वारकरी संप्रदायातील लोक समाजात धार्मिक उपक्रम, अखंड हरिनाम सप्ताह, पारायण सोहळे करीत असून ते प्रदीर्घ काळापासून बंद असल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार कलावंताना आर्थिक मदत द्यावी, देण्यात यावी अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.शिष्टमंडळात मोरेश्वर मेश्राम, योगेश शिवनकर, पुंडलिक बारशे महाराज, मोतीराम भेंडारकर महाराज, एकनाथ ठलाल महाराज, केशव फुंडे महाराज यांचा समावेश होता.

Web Title: Give financial help to Warkari artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.