वारकरी कलावंताना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:32+5:302021-09-05T04:33:32+5:30
गोंदिया : वारकरी साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली असून यासाठी परिषदेच्या गोंदिया ...
गोंदिया : वारकरी साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली असून यासाठी परिषदेच्या गोंदिया शाखेच्यावतीने शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशात कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने समाजातील सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याचा फटका वारकरी साहित्य कलावंतांना बसला. वारकरी संप्रदायातील लोक समाजात धार्मिक उपक्रम, अखंड हरिनाम सप्ताह, पारायण, सोहळे करीत होते व ते प्रदीर्घ काळापासून बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, टाळकरी या सर्व कलावंतांना या संकटाच्या काळात आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात तालुका शाखेचे अध्यक्ष हभप मुन्नालाल ठाकूर, शामराव ठाकूर, ताराचंद चव्हाण, गुणीलाल ठाकूर, शामलाल मारबदे, लिखन निर्विकार, मुन्नालाल रहांगडाले, श्यामलाल कारंजेकर, व्दारकाबाई ब्राम्हणकर, यदूरामजी मोहनकर, हरिभाऊ फुंडे यांचा समावेश होता.
...............