कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:54+5:302021-08-14T04:33:54+5:30
गोरेगाव : कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सरसकट १५ हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ...
गोरेगाव : कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सरसकट १५ हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्या नावे तहसीलदार सचिन गोसावी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनातून कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन, सरसकट १५ हजार रुपये वेतन देण्यात यावे, कोतवाल यांना तलाठी, महसूल सहायक व तत्सम पदासाठी ५० टक्के आरक्षण मंजूर करण्यात यावे, शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून भरण्यात याव्या, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कोतावालांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर समावेश करण्यात यावा, सेवावृत्तीनंतर कोणताही शासकीय लाभ नाही त्यामुळे त्यांना निर्वाह भत्ता म्हणून १० लाख रुपये देण्यात यावा. राष्ट्रीय पेंशन लागू करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता. या मागण्या १५ आगस्टपर्यंत मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेने यावेळी दिलेल्या निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात पुरुषोत्तम रहांगडाले, कमलेश बघेले, दुशांत डोंगरे, विकास चाचेरे, घनश्याम पटले, राकेश वालदे, जितेंद्र चौरीवार, मुकेश मेश्राम, पी.एम.राणे, उपस्थित होते.