‘त्या’ नराधमाला कठोर शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:40 PM2018-12-08T20:40:33+5:302018-12-08T20:41:04+5:30
आमगाव तालुक्यातील ग्राम सातगाव येथील ५ वर्षीय चिमुकलीवर शेजारीलच १७ वर्षीय मुलाने केलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नाभिक समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम सातगाव येथील ५ वर्षीय चिमुकलीवर शेजारीलच १७ वर्षीय मुलाने केलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नाभिक समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली. यासाठी संघटनेच्यावतीने गुरूवारी (दि.६) जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
२३ नोव्हेंबर रोजी ग्राम सातगाव येथील नाभिक समाजातील ५ वर्षीय चिमुकलीवर शेजारीच राहत असलेल्या १७ वर्षीय मुलाने अत्याचार केला. प्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात ३७६, ६, १० या कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस भंडारा येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे. परंतु, भविष्यात अशाप्रकारे कोणत्याही समाजातील चिमुकलीवर अत्याचार करण्याची कोणीही हिंमत करू नये यासाठी सदर आरोपीस फाशी किंवा आयुष्यभर कारावासाची शिक्षा देण्यात यावी. तसेच चिमुकलीला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
आपल्या मागणीसाठी संघटनेच्यावतीने गुरूवारी (दि.६) जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने यांच्या मार्गदर्शनात निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सोहन क्षीरसागर, सचिव सुरेश चन्ने, सतिश साखरकर, कोषाध्यक्ष घनशाम मेश्राम, संघटक सुरेश चन्ने, सलून संघटनेचे जिल्हाध्यक्ष वासु भाकरे, सचिव दुलीचंद भाकरे, जिल्हा युवाध्यक्ष रविंद्र चन्ने, जिल्हा महिलाध्यक्ष अनिता चन्ने, उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष सुशील उमरे, चंद्रभान सूर्यकार, पुरुषोत्तम सूर्यकार, गोंदिया तालुकाध्यक्ष भुमेश मेश्राम, प्रदिप लांज़ेवार, चुन्नीलाल सूर्यवंशी, महेश लांज़ेवार, चुन्नीलाल लक्षणे, खेमराज बारसागडे, आमगाव तालुकाध्यक्ष संतोष लक्षणे, गजानन चन्ने, दुर्गाप्रसाद चन्ने, राकेश चन्ने, रामेश्वर मेश्राम आणि ग्रा.पं. सदस्य कास्मिरासिंह बैस उपस्थित होते.