शेतकऱ्यांना त्वरित बोनस द्या, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:22+5:302021-06-22T04:20:22+5:30
देवरी : धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारी बोनसची रक्कम अद्याप देण्यात आली नाही, तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील चुकारे ...
देवरी : धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारी बोनसची रक्कम अद्याप देण्यात आली नाही, तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील चुकारे अद्याप त्यांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर आघाडी सरकार अन्याय करीत आहे. आठ दिवसांत धान उत्पादकांना बोनस न मिळाल्यास भाजपतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आ. संजय पुराम यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यातच बोनस देणे अपेक्षित होते, पण सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही बोनसची रक्कम दिली नाही. ऐन हंगामात शासन शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करून त्यांच्यावर अन्याय करीत आहे. भाजप हा अन्याय कधीही सहन करणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे बोनस त्वरित देण्यात यावे. पुराम यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क सांगूृन त्यांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.