मग्रारोहयोच्या कुशल कामाचे देयक तत्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 09:08 PM2018-04-30T21:08:57+5:302018-04-30T21:08:57+5:30
पंचायत समिती अंतर्गत २०१५ ते २०१८ पर्यंत झालेल्या मग्रारोहयोच्या अंतर्गत कुशल कामाचे देयक अजूनही मिळाले नाही. सदर देयक लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : पंचायत समिती अंतर्गत २०१५ ते २०१८ पर्यंत झालेल्या मग्रारोहयोच्या अंतर्गत कुशल कामाचे देयक अजूनही मिळाले नाही. सदर देयक लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून २०१५ ते २०१८ या दरम्यान गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी मग्रारोहयोचे कामे केली. यातील कुशल कामाचे देयक अजूनही देण्यात आले नाही. याची सरपंच सेवा संघाने दखल घेत थेट आमदाराला निवेदन देऊन सदर प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी तेजेंद्र हरिणखेडे, सोमेश्वर रहांगडाले, उत्तम कटरे, योगेश चौधरी, जितू डोंगरे, उषा रहांगडाले उपस्थित होते. मग्रारोहयोच्या कुशल कामाच्या देयका संदर्भात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याशी पत्रव्यवहार करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन रहांगडाले यांनी दिले.
तसेच लवकरच कुशल कामाचे देयक मंजूर करण्यात येईल, पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले.
गेल्या तीन वर्षापासून कुशल कामाचे देयक न मिळाल्यामुळे विकास कामात अडचण निर्माण होत होती. निधी प्राप्त न झाल्यामुळे शेतकरी, मजूर हवालदिल झाले होते. सदर प्रकार आमदाराच्या निदर्शनात आणून दिल्यावर त्यांनी त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे निधी मिळण्याची आशा आहे.
-तेजेंद्र हरिणखेडे
सरपंच ग्राम पंचायत कटंगी (गोरेगाव)