रब्बी धानपिकाला धरणाचे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 09:26 PM2018-12-09T21:26:08+5:302018-12-09T21:26:50+5:30

इटियाडोह धरणात पर्याप्त पाणीसाठा असतांनाही रब्बी धानपिकांच्या केवळ २१०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे षडयंत्र इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाने रचले आहे. हा लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांवर अन्याय आहे.

Give irrigation water to Rabi Dhanika | रब्बी धानपिकाला धरणाचे पाणी द्या

रब्बी धानपिकाला धरणाचे पाणी द्या

Next
ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणात पर्याप्त पाणीसाठा असतांनाही रब्बी धानपिकांच्या केवळ २१०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे षडयंत्र इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाने रचले आहे. हा लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे वडेगाव वितरीकेपर्यंत ३९०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन द्यावे असे निवेदन येत्या २ ते ३ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
यासंदर्भात धाबेटेकडी-आदर्श येथील कृषी विद्यालयात शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहूणे म्हणून जि.प.सदस्य किशोर तरोणे, राकॉचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, सरपंच दिपक सोनवाने, विनायक मस्के, माणिक सोनवाने, बुराडे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागावर यावेळी तिव्र असंतोष व्यक्त केला. काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या शेतीला सिंचन व्हावे यासाठी केवळ अर्जुनी-मोरगाव पर्यंत पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रह धरला.
३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत धानपिकाला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आम्ही कडधान्याचा विचार न करता धान पीक लागवडीसाठी मशागत केली. मात्र आता केवळ २१०० हेक्टरला अर्जुनी-मोरगाव पर्यंत सिंचन होईल असा फतवा काढल्यामुळे आमची फसगत केली असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. एकतर शेतीला पाणी द्यावे अन्यथा आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ही बाब मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

अन्याय सहन करणार नाही- चंद्रिकापुरे
गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. प्रकल्पातील पाण्याने शेवटच्या टोकापर्यंत सिंचन व्हावे हा दृष्टीकोन आहे. वडेगाव वितरीकेपर्यंत सिंचनाची शेतकºयांची मागणी आहे. ही मागणी अगदी रास्त आहे. या तालुक्यात हा प्रकल्प आहे. निदान त्या तालुक्यातील शेतकºयांचे सिंचन झाले पाहिजे. आपण याबाबतीत शेतकºयांसोबत आहोत. शेतकºयांवरील हा अन्याय सहन करणार नाही. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया चंद्रीकापुरे यांनी व्यक्त केली.

पाण्याचा अपव्यय
इटियाडोह कालव्यातून वाहणारे पाणी अनेक ठिकाणी झिरपते. त्यामुळे कालव्याच्या आजूबाजूला पाणी दिसून येते. दरवर्षी कालवा कुठे ना कुठे तरी फुटतो. त्यामुळेही बºयाच पाण्याचा अपव्यय होतो. १४ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान कालव्यातून निरर्थक कारणाने पाणी वाहत होते. हे पाणी वेळीच थांबविले असते तर धरणातील पाण्याचा साठा अधिक राहीला असता ज्यामुळे रब्बी हंगामात अधीक शेतकºयांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देता आले असते. मात्र अधिकाºयांची मानसिकताच नसल्याचा आरोप ललीत खोब्रागडे या शेतकºयाने केला आहे.

Web Title: Give irrigation water to Rabi Dhanika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.