एक जॉबकार्डधारकाला २५० दिवस काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:51 AM2017-12-20T00:51:21+5:302017-12-20T00:53:00+5:30

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी,

Give a Job Card holder work for 250 days | एक जॉबकार्डधारकाला २५० दिवस काम द्या

एक जॉबकार्डधारकाला २५० दिवस काम द्या

Next
ठळक मुद्देदिलीप बन्सोड : १०० दिवस कामाचा नियम स्थगित करा

लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देवून केली आहे.
निवेदनानुसार, शासनाने एका कुटुंबात एक जॉबकार्ड तयार केल्यास १०० दिवस काम उपलब्ध करून देण्यात येईल, अशी तरतूद केली. एका जॉबकार्डमध्ये पाच नावे असतील तर २० दिवसच काम एका कुटुंबाला मिळणार आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने वर्षभर उदरनिर्वाह कसा करावा, अशी समस्या निर्माण झाली आहे.
भारत सरकारने १०० दिवस प्रत्येक कुटुंबाला काम देण्याची योजना तयार केली. त्यासाठी कुटुंबाला जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करताना स्पष्ट निर्देश देण्यात आले नसल्याने लाभार्थी कुटुंबाने एकाच जॉबकार्डमध्ये अनेक नावे नोंदविले. त्यामुळे एक पंधरवाडा किंवा तीन आठवडे काम पूर्ण झाले की त्या मजुराला कामावरून बंद केले जात आहे, असेही माजी आ. बन्सोड यांनी सांगितले.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थित आहे. शेतकरी व शेतमजुरांना कामे नाहीत. अशात त्यांनी काय करावे.
वर्षभर परिवाराचे भरणपोषण व शैक्षणिक समस्या कशी सोडवावी. अशी समस्या आहे. त्यामुळे शासनाने एका जॉबकार्डवर कमीतकमी २०० किंवा २५० दिवस कामाची सीमा वाढवावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.
रोहयो राज्य शासनाची
नरेगा ही भारत सरकारची योजना असून यात १०० दिवस काम देण्याची हमी देण्यात आली आहे. मात्र रोहयो ही राज्य शासनाची योजना असून यात अशी कोणतीही अट नाही. राज्य शासनाने शेतकरी व मजुरांची गंभीर समस्या पाहून जिल्ह्यात रोहयोची कामे करून सरसकट प्रत्येक मजुराला काम मिळेल, अशी योजना तयार करावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.
अनेक कुटुंब कामावरून बंद
वर्षभरात १०० दिवसांचे कामपूर्ण झाल्याचे सांगून अनेक मजूर कामावरून बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांना एप्रिल महिन्यापर्यंत काम मिळणार नाही, अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार शासनाने करावा. कुटुंबावर अन्याय होणार नाही, अशी उपाययोजना करावी.
मजुरांसोबत उपोषणाचा इशारा
केंद्र शासनाने आपल्या १०० दिवसांच्या कामाच्या आदेशात किंवा योजनेत बदल करून आपातस्थितीत कामाचा कालावधी वाढविण्यात यावा. तसेच राज्य शासनाने रोहयोच्या कामात वाढ करून मजुरांची समस्या मार्गी लावावी. वर्षभर पुरेल अशी व्यवस्था भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यांसाठी करावी, अन्यथा मजुरांसह आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

Web Title: Give a Job Card holder work for 250 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी