पत्रकारांना कोविड विम्याचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:37+5:302021-05-09T04:29:37+5:30
तिरोडा : कोविड संसर्ग काळात फ्रंटलाइन वर्कर्सप्रमाणे पत्रकारसुद्धा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम करीत आहेत, तर महाराष्ट्रात आतापर्यंत ...
तिरोडा : कोविड संसर्ग काळात फ्रंटलाइन वर्कर्सप्रमाणे पत्रकारसुद्धा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम करीत आहेत, तर महाराष्ट्रात आतापर्यंत १०७ पत्रकारांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. गोंदिया येथेसुद्धा दोन दिवसांपूर्वी एका पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे शासनाने पत्रकारांना ५० लाख रुपयांचा विमा लागू करण्याची मागणी तिरोडा तालुका पत्रकार संघाने केली आहे.
लोकांना बातम्यांद्वारे शासकीय योजनांच्या समस्यांविषयी जागरूक करण्याचे काम पत्रकारांच्या माध्यमातून केले जाते. यावेळी, त्यांना आपल्या जीवनाची देखील पर्वा नसते. दोन दिवसांपूर्वी गोंदियामध्ये एका पत्रकाराचे कोरोनामुळे निधन झाले. अनेक पत्रकार संक्रमित झाल्यावर उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेसुद्धा दुर्लक्ष झाले आहे. पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर दर्जा देऊन विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तालुका पत्रकार संघाचे लक्ष्मीनारायण दुबे यांनी केली आहे.