त्या २२ कुटुंबांना न्याय द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:09+5:302021-03-13T04:53:09+5:30
गोंदिया : बिरसी विमानतळ प्राधिकरणकडून २२ कुटुंबांची घरे तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ जेसीबी मशीन लावल्या होत्या. मंदिर तसेच शासनाच्या ...
गोंदिया : बिरसी विमानतळ प्राधिकरणकडून २२ कुटुंबांची घरे तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ जेसीबी मशीन लावल्या होत्या. मंदिर तसेच शासनाच्या घरकुल योजनेतील घरांनाही तोडण्यात आले. घर तोडण्यापूर्वी त्यांना १५ दिवसांत निवाऱ्याची सोय करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यांची सोय न झाल्याने न्याय देण्यात यावा, अशी मागणी हे २२ कुटुंबीय करीत आहेत.
अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या २२ कुटुंबांच्या घरावर जेसीबी चालवून जमीनदोस्त करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ या लोकांना मिळाला होता. रस्ते, वीज, शौचालय, इंदिरा आवास योजनेच्या सर्व सुविधा शासनाने दिल्या होत्या. मात्र त्या कुटुबीयांना बेघर करण्यात आले आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते यांनी घरे तोडण्यापूर्वी १५ दिवसांत निवाऱ्याची सोय करणार, असे आश्वासन दिले होते. हे दिवाणी प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाने अविलंब लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ते २२ कुटुंबीय करीत आहेत.