गरजेएवढे बियाणे शेतकऱ्यांना नि:शुल्क द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 08:33 PM2018-06-14T20:33:00+5:302018-06-14T20:33:00+5:30
शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर बियाण्यांची एक बॅग मिळत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना जेवढ्या बियाण्यांची गरज आहे, तेवढे बियाणे नि:शुल्क शासनाकडून त्वरित देण्यात यावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर बियाण्यांची एक बॅग मिळत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना जेवढ्या बियाण्यांची गरज आहे, तेवढे बियाणे नि:शुल्क शासनाकडून त्वरित देण्यात यावे. अन्यथा बळीराजा शेतकरी संघ शेतकऱ्यांच्या हितात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
बळीराजा शेतकरी संघाच्या इतर मागण्यांमध्ये खरीप हंगामात कर्ज व बियाणे मिळण्यासाठी तलाठी कार्यालयातून सातबारा त्वरीत देण्यात यावा. एका सातबाऱ्यावर एक बॅग बियाणे ही अट शिथिल करावी. बियाणे नि:शुल्क किंवा ५० टक्के अनुदानावर द्यावे. सातबाऱ्यावर जेवढे खत हवे आहे तेवढे खत शेतकऱ्यांना देण्यात यावे. डिझेल पंपासाठी शेतकऱ्यांना कमी दरात डिझेल द्यावे. दुष्काळात शासनाने घोषित केलेले पेर-नापेरचे अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, ते त्वरित जमा करावे. शेतकºयांना मागील विमा योजनेचे रूपये तात्काळ देण्यात यावे. यावर्षीचा खरीप हंगाम विमा करणाºया विमा कंपन्यांना त्वरित सूचना देण्यात यावी. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाच्या बोनसची रक्कम त्वरीत देण्यात यावी. पेरणीच्या वेळी कृषी सहायकांनी गावात उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. बियाणे व खताच्या कमतरतेवेळी शेतकऱ्यांच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
क्रॉप लोन तात्काळ द्यावे. नैसर्गिक आपत्ती निधीतून शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुदान द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष संजयसिंह टेंभरे, चुटियाच्या सरपंच चंद्रकला तुरकर, उपसरपंच रामू शरणागत, माजी सरपंच रतनलाल बघेले, कुंडलीक तुरकर, डोमाजी टेंभरे, दुलीचंद कटरे, कुवरलाल शरणागत, मुन्नालाल तुरकर, दुर्गाप्रसाद कुरंजेकर, समलीक तुरकर, धनलाल गौतम, अशोक टेंभरे, जीवनलाल पटले, देवनाथ येलसरे, मुन्नालाल गौतम, हरिलाल गराकाटे, मोहनलाल कटरे, मदनलाल तुरकर, तुलाराम दिहारी, योवकराम रहांगडाले, रूपचंद शरणागत, टीकाराम टेंभरे, उत्तम भगत, भरतलाल रिनाईत, एस.वाय. तुरकर, पुरण पटले, सुनील टेंभरे, पप्पू ठाकरे, उर्मिला रहमतकर, श्रीधर चन्ने, देवचंद बिसेन, रोशन बोपचे, दुलीचंद गायधने, शेजगावचे सरपंच मुन्ना चौरागडे, मुनेश कावडे, सुरेंद्र दमाहे, राजेंद्र मेश्राम, राजेंद्र पटले आदी उपस्थित होते.