आयुर्वेदिक दवाखान्याला नियमित डॉक्टर द्या
By Admin | Published: August 13, 2016 12:16 AM2016-08-13T00:16:49+5:302016-08-13T00:16:49+5:30
येथे जिल्हा परिषदेचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. या दवाखान्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमीत निवड आहे.
एका डॉक्टरकडे दोन दवाखाने : पदभरती नाही, रुग्णांना होतो त्रास
बाराभाटी : येथे जिल्हा परिषदेचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. या दवाखान्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमीत निवड आहे. पण सदर दवाखान्याच्या डॉक्टरांना गोठणगाव दवाखान्याला जावे लागते म्हणून येथील दवाखान्याला नियमीत डॉक्टर द्या अशी रुग्णांची मागणी आहे.
येथील दवाखान्याच्या डॉक्टरांना आठवड्यातून अर्धे दिवस गोठणगावचा दवाखाना सांभाळावा लागतो. हे एक डॉक्टर दोन दवाखाने सांभाळत आहेत. गोठणगाव आरोग्य केंद्रात डॉक्टरची दोन पदे असून त्यातील एक पद रिक्त आहे.
अनेकदा परिसरातील रुग्ण येथील दवाखान्यात आले असता डॉक्टर गोठणगावला गेले असे परिचराकडून माहिती होते. यामुळे परिसरातील रुग्णांना त्रास होत आहे. करिता येथील दवाखान्याला नियमीत डॉक्टर द्या अशी मागणी बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, कवठा, ब्राम्हणटोला, सुकडी, डोंगरगाव आदी गावातील गावकऱ्यांची आहे. (वार्ताहर)
गोठणगाव आरोग्य केंद्राला एक डॉक्टर असून एक पद रिक्त आहे. जे डॉक्टर आहेत हे विविध सभा, मिटींग यांना जात असतात. त्यामुळे बाराभाटीच्या डॉक्टरांना गोठणगावला जावे लागते. ते बाराभाटीला राहतील याचा मी पाठपुरावा करतो.
डॉ. विजय राऊत
तालुका वैद्यकीय अधिकारी अर्जुनी-मोरगाव.