धानाला ३०० रूपये बोनस द्या
By admin | Published: June 11, 2017 01:09 AM2017-06-11T01:09:50+5:302017-06-11T01:09:50+5:30
रबी हंगामातील धानाला ३०० रूपये बोनस देण्यात यावे. तसेच सरसकट कर्जमाफी व ५० क्विंटलची अट रद्द करून
जिल्हा कॉंग्रेस कमिटीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रबी हंगामातील धानाला ३०० रूपये बोनस देण्यात यावे. तसेच सरसकट कर्जमाफी व ५० क्विंटलची अट रद्द करून पूर्ण धानावर बोनस देण्यात यावे अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
मागील दोन-तीन वर्षात शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत असून मानसीकरित्या त्रस्त आहे. अशात आता शासनाने काही अटी लावून कर्जमाफीची घोषणा केली आहे. या कर्जमाफीची कारवाई येत्या ४-५ महिन्यांत सुरू होणार व त्यामधात राज्यातील कित्येक शेतकरी आत्महत्येच्या पाशात अडकणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. जिल्ह्यात धान हेच प्रमुख पीक असल्याने यावरच लाखो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. अशात खरिपात शासनाने बोनस तर दिला. मात्र त्यावर ५० क्ंिवटल प्रती शेतकरी अशी अटल लावून शेतकऱ्यांसोबत अन्याय केला.
रबी हंगामातील धानाचे उत्पादन खरिपाच्या तुलनेत एक चतुर्थांश असते. अशात बोनस दिल्यास शासनावर जास्त आर्थिक बोजा येणार नाही. मात्र लाखो शेतकऱ्यांच्या परिवाराला जरूर मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर रबीच्या धानालाही ३०० रूपये क्ंिवटल बोनस द्यावा. तसेच ५० क्ंिवटलची अट रद्द करण्याची मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केली असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांच्या नेतृत्वात निवेदन देताना प्रतिनिधी मंडळात पन्नालाल सहारे, उषा मेंढे, डॉ.योगेंद्र भगत, पी.जी.कटरे, माधुरी हरिणखेडे, विमल नागपूरे, संदीप ठाकूर, संदीप रहांगडाले, पृथ्वीपालसिंग गुलाटी, पृथ्वीराज चव्हाण, शेषराव गिऱ्हेपूंजे, अनिल फुंडे, दिलीप असाटी, राधेलाल पटले, प्रकाश रहमतकर, राधेश्याम बगडिया, अपूर्व अग्रवाल, संदीप भाटीया, सहसराम कोरोटे, राजेश नंदागवळी, रमेश अंबुले, रत्नदीप दहिवले, हिरालाल फाफनवाडे, नटवरलाल गांधी, अशोक चौधरी, रानू नशिने, भागवत नाकाडे, गिरीश पालीवाल, जय राठोड, परसराम माने, देवेंद्र अग्रवाल, इंद्रदास झिलपे, लता दोनोडे, आशिष चव्हाण, अनील मते यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.