उन्हाळी पिकासाठी प्रकल्पाचे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:03 PM2017-12-21T22:03:06+5:302017-12-21T22:03:32+5:30

Give water to the project for a summer crop | उन्हाळी पिकासाठी प्रकल्पाचे पाणी द्या

उन्हाळी पिकासाठी प्रकल्पाचे पाणी द्या

Next
ठळक मुद्देदिलीप बन्सोड : पाण्याचे स्रोत वाढविणे शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही भरपाई उन्हाळी पीक घेवून भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र प्रशासनाने उन्हाळी पीक न घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता उन्हाळी पिकांसाठी धापेवाडा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे.
यंदा कमी पावसामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरीपातील पिकांचे पाऊस आणि कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हाती आलेले पिक पावसाअभावी गमवावे लागल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी देण्याची मागणी शेतकºयांची आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत कवलेवाडा, धादरी, बेलाटी, मुंडीपार, सालेबर्डी, चिरेखनी, बेलाटी या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत ३५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ७ मिटर पाणी बाहेर वाहत आहे. महिनाभरात वाहुन जाणारे १ लाख १० हजार घनमिटर पाणी अडविणे शक्य आहे. त्यासाठी आत्तापासून पाणी साठवून ठेवल्यास पाणी टंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य असल्याचे बन्सोंड यांनी सांगितले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. शेतकऱ्यांना पाणी दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यास मदत होईल. वीज प्रकल्पाला दिले जाणारे पाणी जानेवारी २०१८ पासूनच देणे बंद केल्यास उन्हाळी पिकांना पाणी देणे शक्य असल्याचे बन्सोड यांनी सांगितले.
पाणी साठविण्यासाठी उपाययोजनेचा अभाव
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र आजूबाजूला कोणत्याही ठिकाणी पाण्याची साठवणूक करण्याची उपाययोजना करण्यात आली नाही. वैनगंगा नदीला एप्रिल-मे महिन्यात पाण्याचा येवा बंद होता. हे प्रकल्पाच्या अधिकाºयांना माहिती आहे, असे असताना आतापर्यंत पाणी साठविण्यासाठी कुठलीच उपाय योजना करण्यात आली नाही.
पाणीटंचाईवर मात शक्य
रब्बी व उन्हाळी धान पिकासंबंधीत धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावांना पिण्यासाठी पाणी दिल्यास विहिरी, बोअरवेल, तळ्याच्या पाणीसाठ्यात वाढ करण्यास मदत होईल. यामुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल.पावसाळ्यात ३० मी. मी. व उन्हाळ्यात ३५ दलघमी पाणी लागते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाणी टंचाईच्या समस्येवर मात करुन उन्हाळी पिकांना पाणी देणे शक्य होईल.
टप्पा-२ द्वारे सर्व तळ्यात पाणी
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा-२ ची निर्मिती करण्यात आली आहे. यातून परिसरातील तळ्यांना पाणी देणे शक्य आहे. मात्र कुठल्याही तलावात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे या प्रकल्पाची ज्या उद्देशाने निर्मिती करण्यात आली तो उद्देश देखील साध्य होत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Give water to the project for a summer crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.