ग्रंथदिंडीने लक्ष वेधले
By admin | Published: October 17, 2016 12:38 AM2016-10-17T00:38:50+5:302016-10-17T00:38:50+5:30
माजी राष्ट्रपती व युवकांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून येथील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये साजरी करण्यात आली.
इटखेडा : माजी राष्ट्रपती व युवकांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून येथील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये साजरी करण्यात आली. या निमित्ताने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले.
शालेय अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, युवक-युवती, नागरिकांमध्ये पुस्तके वाचून ज्ञान प्राप्तीची रुची वाढीस लागावी, प्राप्त ज्ञानाचा लाभ सुदृढ समाजनिर्मितीसाठी व्हावी याची जनजागृती करण्यासाठी इसापूर-इटखेडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, स्वामी विवेकानंद व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ज्ञान विकास वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. सर्व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रा.पं.चे पदाधिकारी, वाचन प्रेमी नागरिक ग्रंथ दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची प्रतिमा व विविध विषयावरील ग्रंथ यांनी सुशोभीत केले. रथ रस्त्यावरून निघालेले पाहून या मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले. वाचनाप्रती जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले घोषणा फलक, बॅनर्स यांनी ग्रंथदिंडीची शोभा वाढविली.
इसापूर-इटखेडा या दोन्ही गावातून या ग्रंथदिडीचे मार्गक्रमण केले. ग्रंथदिंडीमध्ये माजी सभापती उमाकांत ढेंगे, सरपंच अस्मिता वैद्य, पं.स.उपसभापती आशा झिलपे, उपसरपंच वासुदेव उके, देविदान पालीवाल, विश्वनाथ गोठे, मोरेश्वर भावे, पुंडलिक धोटे, वसंता हटवार, कुंता कोकोडे, सुशिला गोंडाणे, चेतन शेंडे, मोरेश्वर गोंडाणे, प्रल्हाद चांदेवार, चंद्रकला शेंडे, विजय मेश्राम, प्रमोद वकेकार, दिगांबर झिलपे, अशोक डोंगरे, अभिमन्यू लोणारे, माजी प्राचार्य लक्ष्मण माटे, संतोष रोकडे, सुनिता मडावी, प्राचार्य लहू भावे, पर्यवेक्षक भूवन झोडे, प्राचार्य विश्वनाथ डांगे, मुख्याध्यापक यशवंत शेंडे, अशोक गुप्ता, संगीता नवखरे, भारती रामटेके, नितु परविन पठाण, प्रा.भगवंत फुलकटवार, पूर्णचंद्र धोटे, धनेश लंजे, बालाजी मस्के, संजय खुणे, राजेश धोटे, जयप्रकाश करंजेकर, आदे, अनिल भावे, आकरे, भाकरे, पेशने, धर्मपाल तोंडरे, पद्मजा मेहंदळे, पुष्पा फुंडे, देविदास नाकतोडे, राजु डोंगरवार, हरिभाऊ शेंडे, दुधराम कोल्हे, राजू शेंडे, बनकर, कासार, बनसोड, जयप्रकाश मेश्राम, यशवंत मेश्राम, पुरूषोत्तम राऊत उपस्थित होते.