घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांचा गौरव ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:33+5:302021-07-02T04:20:33+5:30
पात्र लाभार्थ्यांना हक्काचा टुमदार निवारा कायमस्वरूपी मिळावा यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येतो. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी ...
पात्र लाभार्थ्यांना हक्काचा टुमदार निवारा कायमस्वरूपी मिळावा यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येतो. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी वेळेच्या आत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी अपेक्षा असते. २० नोव्हेंबर ते ६ जून २०२१ या कालावधीत घरकुलाचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना महाआवास अभियान पुरस्कार अंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. गावातील प्रशांत लांडगे, कांता ठवरे, पदमाकर फुल्लुके, तुळशीदास शेंडे, दादाजी मेश्राम, अजय शेंडे, या सहा लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्र घरासमोर लावण्यासाठी एक रोपटे सरपंच प्रतिमा बोरकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविस्तार अधिकारी पुरुषोत्तम समरीत यांनी केले, तर आभार रोजगार सेवक सचिन नाकाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनोज पालीवाल, भोजराज मेश्राम, विश्वास लोणारे यांनी परिश्रम घेतले.