जीएमबीची सलोनी, सरस्वतीचा तन्मय अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:29 PM2018-06-08T23:29:00+5:302018-06-08T23:29:00+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा निकाल ८७.५५ टक्के लागला असून नागपूर विभागात अव्वल स्थान पटकाविले आहे.

GmbH Saloni, Saraswati Tanmaya Top | जीएमबीची सलोनी, सरस्वतीचा तन्मय अव्वल

जीएमबीची सलोनी, सरस्वतीचा तन्मय अव्वल

Next
ठळक मुद्देनागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल : निकालाची टक्केवारी सुधारली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा निकाल ८७.५५ टक्के लागला असून नागपूर विभागात अव्वल स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यात संयुक्तपणे अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा तन्मय रामेश्वर खोब्रागडे ९७.२० व येथीलच जी. एम. बी. हायस्कूलची विद्यार्थिनी सलोनी योगेश पालीवाल ९७.२० टक्के गुण घेवून जिल्ह्यात अवल्ल ठरले.
मागील वर्षी गोंदिया जिल्हा विभागात चौथ्या क्रमांकावर होता. तर यंदा जिल्ह्याने चौथ्या स्थानावरुन एकदम पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात सुधारणा झाली असून दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून ८९.९६ टक्के मुली उर्तीण झाल्या आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठीे जिल्ह्यातील एकूण २२ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी २२ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १९ हजार ७८९ विद्यार्थी उर्तीण झाले. यात ९ हजार ९३६ मुल तर ९ हजार ८५९ मुलीे उर्तीण झाल्या. ८५.२९ टक्के मुले तर ८९.९६ टक्के मुली उर्तीण झाल्या. प्राविण्य श्रेणीत ३ हजार ८२७ विद्यार्थी उर्तीण झाले. तर प्रथम श्रेणीत ७ हजार ७८०, व्दितीय श्रेणीत ६ हजार ९६३ विद्यार्थी उर्तीण झाले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.५५ टक्के लागला. मागील वर्षीच्या निकालाच्या टक्केवारीच्या तुलनेत यंदा ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील ४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक संयुक्तपणे अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा तन्मय रामेश्वर खोब्रागडे ९७.२० व येथील जी.एम.बी.हायस्कूलची विद्यार्थिनी सलोनी योगेश पालीवाल ९७.२० टक्के गुण घेवून जिल्ह्यात अवल्ल ठरले. तर आमगाव येथील आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी व्टिंकल बागडे हिने ९७ टक्के गुण घेत जिल्ह्यातून व्दितीय स्थान पटकाविले. तर याच विद्यालयाची इमांशी पटले ९६.६७ टक्के गुण घेतले. विशेष म्हणजे सरस्वती विद्यालयाचे ३७ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेवून उर्तीण झाले. गोंदिया येथील सिंधी हायस्कूलचा निकाल ८५.८६ टक्के लागला. या हायस्कूलची विद्यार्थिनी मुस्कान आहुजा हिने ९०.६० टक्के गुण प्राप्त करुन प्रथम तर मासूम प्रभूदास पटले यांने ८७.४० टक्के गुण घेवून व्दितीय व चैतन्य रेवाराम लोनारकर याने ८७ टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. प्रोग्रेसिव्ह मराठी हायस्कूलची विद्यार्थिनी कोमल चांदेवार हिने ९२.४० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम, करण राठोड याने ९२ टक्के गुण घेऊन द्वितीय तर संकेत पदारे याने ९१.८० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. प्रोग्रेसिव्ह इंग्लीश हायस्कूलमधील मृणाल जगनाडे हिने ९३.६० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम, विभा ठाकरे हिने ९३.४० टक्के गुण घेऊन द्वितीय तर जुही शरणागत हिने ९३.२० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. गुजराती नॅशनल हायस्कूलची मेघा बिसेन हिने ९६ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम, अनुभुती झा हिने ९५.४० टक्के गुण घेऊन द्वितीय तर तनुश्री करंजेकर हिने ९४.६० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. श्री गणेशन कॉन्व्हेंट हायस्कूलमधून आयुषी सुनील अग्रवाल हिने प्रथम, प्रचिती सुरेश आष्टीकर हिने द्वितीय तर साक्षी धरमदास बघेले हिने तृतीय क्रमांक पटकाविला. विवेक मंदिर शाळेतून श्वेता वसंत शहारे हिने ९५ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम, गुरप्रीत ठकरानी हिने ९४.८ टक्के गुण घेऊन द्वितीय व हिना रहांगडाले हिने ९४ टक्के गुण घेतले.
निकालात मुलींचीच बाजी
अलीकडेच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात जिल्ह्यात सर्वाधिक मुलीच उर्तीण झाल्या होत्या. तीच परंपरा दहावीच्या निकालात सुध्दा कायम ठेवली. दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८५९ मुली उर्तीण झाल्या असून त्यांची एकूण टक्केवारी ८९.९६ टक्के आहे. तर मुलांच्या उर्तीण होण्याची टक्केवारी ८५.२९ टक्के आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत मुलींनी मुलांपेक्षा एक पाऊल पुढे राहत बाजी मारली आहे.
गुणांची टक्केवारी सुधारली
बारावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेवून उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जिल्ह्यात फार कमी होते. मात्र दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत चांगली सुधारणा झाली आहे.९० टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यंदा बऱ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.
४३ शाळांनी गाठली शंभरी
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा दहावीच्या परीक्षेत कायम ठेवली आहे. या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून जिल्ह्यातील एकूण ४३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
आता पालकांचे लक्ष मिशन अ‍ॅडमिशनकडे
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या पाल्याला त्याच्या आवडत्या शाखेत प्रवेश मिळावा,यासाठी त्यांची धडपड सुरू होते. त्यामुळे निकालानंतर आता पालक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे.

Web Title: GmbH Saloni, Saraswati Tanmaya Top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.