विश्वस्तरीय आरोग्य सेवा मिळावी हेच लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:28 AM2019-01-12T01:28:32+5:302019-01-12T01:29:18+5:30
गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यामागे आमचे दोन उद्देश होते. एकतर तर येथील तरूणांना कमीतकमी खर्चात डॉक्टर बनण्याची संधी मिळावी. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील रूग्णांना उपचार उपलब्ध व्हावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यामागे आमचे दोन उद्देश होते. एकतर तर येथील तरूणांना कमीतकमी खर्चात डॉक्टर बनण्याची संधी मिळावी. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील रूग्णांना उपचार उपलब्ध व्हावे. जिल्ह्यातील एकाही रूग्णाला उपचारासाठी नागपूर किंवा मुंबईला जावे लागू नये व त्यांना येथेच विश्वस्तरीय आरोग्य सेवा मिळावी हेच आमचे लक्ष्य असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम रावणवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, यावर्षी तालुक्यातील ग्राम सिवनी, लोहारा, तुमखेडा खुर्द, फुलचूरपेठ, बाजारटोला, पिंडकेपार, घिवारी, चांदनीटोला, खळबंदा, मोगर्रा येथे नवीन आरोग्य उपकेंद्रांची स्थापना केली जात आहे. तालुक्यातील ग्राम भागात संभव ती आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, रावणाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांनी ५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच इमारतीचे काम सुरू होणार आहे. आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात जेवढी विकासकामे गोंदिया विधानसभा क्षेत्रात होत आहेत अन्य कोणत्याच क्षेत्रात होत नसल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाला जिल परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, गेंदलाल शरणागत, योगराज उपराडे, अनिल मते, विनिता टेंभरे, निता पटले, प्रमिला करचाल, प्रकाश डहाट, जयप्रकाश बिसेन, सारंग भेलावे, इंद्रानी धावडे, देवेंद्र मानकर, गिरधारी पटले, रवि गजभिये, अंकेश हरिणखेडे, गमचंद तुरकर, मनोज बोरकर, राजु गौतम, टेकचंद सिहारे, सुर्यप्रकाश भगत, जे.सी.तुरकर, सुरेश उपवंशी यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.