रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:13 AM2018-11-07T00:13:54+5:302018-11-07T00:14:31+5:30

जिल्ह्यातील एकाही रुग्णांना उपचार घेण्यासाठी नागपूर व मुंबईला जाण्याची वेळ येवू नये, यासाठी आरोग्याच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.

The goal of providing quality health care to the patients | रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय

रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : चुटीया येथे आरोग्य शिबिर, नवीन १० प्रा.आ.केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील एकाही रुग्णांना उपचार घेण्यासाठी नागपूर व मुंबईला जाण्याची वेळ येवू नये, यासाठी आरोग्याच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील रुग्णांना जागतिक स्तरावरील आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आपले ध्येय असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.
तालुक्यातील चुटीया येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, प.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, माजी.जि.प.सदस्य योगराज उपराडे, पं.स.सदस्य अनिल मते, विनिता टेंभरे, निता पटले, प्रमिला करचाल, प्रकाश डहाट, जयप्रकाश बिसेन, सारंग भेलावे, हरिचंद कावळे, इंद्रानी धावडे, बाबुुुलाल रहांगडाले, डॉ.सुनील कटरे, चंद्रकला तुरकर, रामू शरणागत, हिरा टेंभरे, मनोहर मारगाये, प्रेमलाल पटले, संतोष रहांगडाले, राजकुमार टेकाम, अरविंद उईके, राधेलाल रहांगडाले उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले,गोंदिया तालुक्यातील नागरिकापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहचव्यात यासाठी या तालुक्याचा समावेश शासनाच्या हेल्थवेलनेस योजनेत करण्यात आला आहे. या वर्षी तालुक्यात १० प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येईल. गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने रुग्णांना उपचार घेण्यासाठी नागपूरला ये-जा करण्याचा त्रास कमी झाला आहे.
मडावी म्हणाल्या, आ.अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात गोंदिया विधानसभा क्षेत्रात जेवढी विकास कामे सुरु आहेत. तेवढी एकाही क्षेत्रात सुरू नाही. चुटीया येथे त्यांच्याच प्रयत्नाने आयुर्वेदीक दवाखाना सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. या वेळी आयोजित आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.

Web Title: The goal of providing quality health care to the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.