विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:23 PM2019-04-14T22:23:23+5:302019-04-14T22:23:36+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दूध असून जो हे दूध पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार असे सांगितले होते. मात्र आता देशातील शिक्षण व्यवस्था ही केवळ जी सर म्हणणारी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्रो.डॉ.रतनलाल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दूध असून जो हे दूध पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार असे सांगितले होते. मात्र आता देशातील शिक्षण व्यवस्था ही केवळ जी सर म्हणणारी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्रो.डॉ.रतनलाल यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे रविवारीे (दि.१४) येथील प्रशासकीय भवनासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने सुनील बौध्द, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.निमगडे, आप चे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम मोदी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार, मंगला नंदेश्वर, अमित भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाचीे सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन करण्यात आली. प्रो.रतनालाल म्हणाले, १३ पार्इंट रोस्टरच्या विरोधातील लढाई जरी आपण जिंकली असली तरी अशी लढाई आपल्याला वांरवार लढावी लागू शकते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा सन्मान करीत असल्याचे ढोंग सरकार करीत असून असे ढोंगी सरकार सत्तेवर राहिल्यास वांरवार लढा उभारावा लागेल. त्यामुळेच आता शिक्षण व्यवस्थेला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. मागील वेळेस जेएनयू आणि विद्यापिठात वाद निर्माण करुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यामुळे असा प्रयत्न पुन्हा होवू नये यासाठी रस्तावर उतरुन लढा देण्यासाठी तयार राहा असे आवाहन देखील त्यांनी केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विलास राऊत यांनी केले तर आभार समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार यांनी केले.