बोहल्यावर चढण्यापूर्वीच उपवराला अत्याचार प्रकरणात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 09:16 PM2019-05-05T21:16:06+5:302019-05-05T21:16:28+5:30

गावातील तरूणीला (१९) लग्नाचे आमिष देत तिचे वर्षभरापासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह ठरला. परंतु त्या उपवराने लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी त्या मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिला बेदम मारहाणही केली.

Before going to Bhiwani, they were arrested in the case of abduction | बोहल्यावर चढण्यापूर्वीच उपवराला अत्याचार प्रकरणात अटक

बोहल्यावर चढण्यापूर्वीच उपवराला अत्याचार प्रकरणात अटक

Next
ठळक मुद्देकिकरीपार येथील घटना: गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गावातील तरूणीला (१९) लग्नाचे आमिष देत तिचे वर्षभरापासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह ठरला. परंतु त्या उपवराने लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी त्या मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिला बेदम मारहाणही केली. यासंदर्भात त्या उपवरावर आमगाव पोलिसांत तक्रार करण्यात आली. परिणामी बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्या उपवराला अत्याचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली.
सविस्तर असे की, आमगाव तालुक्यातील ग्राम किकरीपार येथील नीलेश पुनाराम मोटघरे (२५) असे अत्याचारी उपवराचे नाव आहे. निलेश गावातीलच एका अल्पवयीन मुलीला मागील तीन वर्षापासून त्रास देत होता. त्यातच तिच्याशी जवळीक साधून लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. लग्नाचे आमिष देत तिच्यावर लैंगीक अत्याचार करण्याचा प्रकार सुरूच होता. यातच घरच्यांनी त्याचे लग्न गोंदिया तालुक्यातील ग्राम नवरगावकला येथील मुलीशी ठरविले. रितीरिवाजाप्रमाणे त्यांचा साखरपुडा झाला.
तसेच ४ मे रोजी मंडपपूजन व ५ मे रोजी लग्न ठरले. परंतु निलेशने लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ३ मे रोजी सायंकाळी ४ वाजता त्या मुलीवर बळजबरी केली. तू मला भेटली नाही तर तुला ठार करीन अशी धमकी देत तिला मारहाणही करीत होता. ३ एप्रिल रोजीही त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच पिडीत तरूणी घराच्या मागील भागात शौचासाठी गेली असताना निलेशने तिथे जाऊन त्याने तिच्यावर बळजबरी केली. यावेळी तिने आरडाओरड केली असता निलेशने तिला मारहाण केली. तिची हाक ऐकून नातेवाईक आले असता तो पळून गेला.
निलेशचे रविवारी (दि.५) लग्न असताना बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याला आमगाव पोलिसांनी अत्याचार प्रकरणात अटक केली. विशेष म्हणजे, हे प्रकरण दडपण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचेही बोलले जात आहे. परंतु पिडीतेला न्याय देण्यासाठी आमगाव पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला. आरोपी विरूद्ध भादंविच्या कलम ३७६, ३५४, ३५४ ड, २९४, ३२३, ५०६ (२) सहकलम ४, ८ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एक वर्षापासून लैंगिक शोषण
नीलेशने त्या तरूणीला आपल्या जाळ््यात घेतले व लग्नाचे आमिष तसेच धमकी देत तिच्यावर मागील एक वर्षापासून तो बळजबरी करीत होता. गावातील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करीत होता. ही बाब डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालातूनही स्पष्ट झाली आहे.

Web Title: Before going to Bhiwani, they were arrested in the case of abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस