परीक्षेला जाताय, कांदा खिशात ठेवलाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2022 05:00 AM2022-05-01T05:00:00+5:302022-05-01T05:00:06+5:30

यावर्षी मार्च महिन्यापासूनच भर उन्हात विद्यार्थी पेपर सोडू शकत नाही. याचा विचार सीबीएसई बोर्डाने करायला हवा होता. कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. सीबीएसई बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला. एप्रिलपासून परीक्षा सुरू झाल्यामुळे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांच्या जिवाची लाही लाही होत आहे. १८ मेपर्यंत ही दहावीची परीक्षा चालणार असून १३ जूनपर्यंत बारावीची परीक्षा राहणार आहे.

Going to the exam, did you keep the onion in your pocket? | परीक्षेला जाताय, कांदा खिशात ठेवलाय का?

परीक्षेला जाताय, कांदा खिशात ठेवलाय का?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विदर्भातील उन्हाची परिस्थिती लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाने सकाळच्या पाळीत परीक्षा घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी भर उन्हात परीक्षा घेतल्यामुळे परीक्षार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाचे प्रमाण राज्यातील इतर भागात कमी असले तरीही वर्धा जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांवर गेले आहे. पण, परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना या उन्हाच्या तीव्रतेमध्ये घराबाहेर पडावे लागत असल्याने पालकांमध्येही रोष व्यक्त होत आहे.
यावर्षी मार्च महिन्यापासूनच भर उन्हात विद्यार्थी पेपर सोडू शकत नाही. याचा विचार सीबीएसई बोर्डाने करायला हवा होता. कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. सीबीएसई बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला. एप्रिलपासून परीक्षा सुरू झाल्यामुळे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांच्या जिवाची लाही लाही होत आहे. १८ मेपर्यंत ही दहावीची परीक्षा चालणार असून १३ जूनपर्यंत बारावीची परीक्षा राहणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे; पण परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात घराबाहेर पडावे लागत आहे.

पारा ४४ अंशांच्यावर
विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णतेची तीव्र लाट आलेली आहे. जिल्ह्यातील तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाची कुलर किंवा खोली थंड ठेवायची व्यवस्था नाही. तीव्रता जाणवायला लागते. घराबाहेर पडताच अंगाचीही लाही लाही होत आहे. त्यामुळे आपले संरक्षण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पालकांची चिंता वाढली

सूर्य आग ओकत आहे. अकरा वाजताच कडक उन्ह असल्यासारखे जाणवते. ४४ अंश तापमान गेलेले आहे. भर उन्हात उष्णतेच्या तीव्र लाटेत मुलांना परीक्षा केंद्रावर पाठवावे लागत आहे. मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाले तर याला जबाबदार कोण? याचा विचार व्यवस्थापकांनी करायला हवा.
- संतोष वाढई, पालक

विद्यालयांच्या परीक्षा २८ मे पर्यंत चालणार आहे. आताच एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यानंतर मे महिन्यामध्ये काय अवस्था असेल याचा विचारही करू शकत नाही. मुलांची प्रकृती बिघडली तर दुसऱ्या दिवशीचा पेपर देऊ शकणार नाही. त्याचा पूर्ण वर्ष वाया जाईल, याचा विचार करायला पाहिजे.
- राहुल पारखी, पालक 

उन्हापासून बचाव कसा कराल? 
- उन्हाळ्यात थेट सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येणे टाळावे. तसेच उन्हात जास्त न फिरता आपल्या शरीराचं तापमान कसं थंड राहणार याची काळजी घ्यावी. उन्हापासून बचाव करण्यासाठी एक कांदा खिशात ठेवावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे. दिवसभरात भरपूर पाण्याचे सेवन करावे. तसेच शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी. कडक उन्हाळ्यात बाहेर जाताना डोके झाकणे.
nत्यासोबतच गॉगल लावा. यामुळे डोळ्यांचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होईल, घाम शोषून घेतील असे कपडे वापरावे. हलक्या रंगाचे वे सुती कपड़े वापरावे. घराबाहेर जाताना तुमच्याजवळ ग्लुकॉन-डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगा. एसीतून बाहेर आल्यावर काही वेळ एखाद्या जागेवर बसून घ्या. उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अशा सरबतांचे सेवन वाढवावे.

सोयी सुविधांचा अभाव 
भर उन्हाळ्यात परीक्षा सुरू असून शरीराची लाही लाही होत आहे. जिल्ह्यातील काही शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये पंखे नाही.

 

Web Title: Going to the exam, did you keep the onion in your pocket?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा