विमान कंपन्यांना धमकी देणारा गोंदियाचा, दहा वर्षांपूर्वी सोडले गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:33 AM2024-10-30T10:33:43+5:302024-10-30T11:11:34+5:30
उईके याला यापूर्वी २०११ मध्ये दहशतवादावरील एका लेखाच्या प्रकरणातही अटक केल्याची माहिती आहे.
अर्जुनी मोरगाव : विमान कंपन्या, रेल्वे स्टेशन यांना ई-मेल पाठवून धमक्या देणारा जगदीश उईके हा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव टोली येथील मूळ रहिवासी आहे. सध्या त्याचे कुटुंबीय गोंदिया येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे. तपासात त्याचे नाव पुढे आल्याने मंगळवारी खळबळ उडाली. उईकेने हे कृत्य केल्याचा नागपूर पोलिसांना संशय आहे. उईके याला यापूर्वी २०११ मध्ये दहशतवादावरील एका लेखाच्या प्रकरणातही अटक केल्याची माहिती आहे.
जगदीशच्या मागावर पोलिस
सूत्रांच्या माहितीनुसार, विविध धमक्यांचे ई-मेल पाठविणारा संशयित आरोपी जगदीश उईके सध्या फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकाकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
आणखी १०० विमानांत बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या
नवी दिल्ली/मुंबई : भारतातील विविध विमान कंपन्यांच्या सुमारे १००हून अधिक विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मंगळवारी देण्यात आल्या अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या १६ दिवसांत देशात व आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करणाऱ्या ५१० विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या देण्यात आल्या. यातील बहुसंख्य धमक्या या सोशल मीडियाद्वारे मिळाल्या आहेत.