Gondia: पेपर देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, साखरीटोला-तेलीटोला मार्गावरील घटना

By अंकुश गुंडावार | Published: July 26, 2023 04:55 PM2023-07-26T16:55:15+5:302023-07-26T16:56:03+5:30

Gondia Accident News: बीएससीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर मोटारसायकलने जात असलेल्या विद्यार्थ्याच्या मोटारसायकलने एसटीला मागून धडक दिल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.

Gondia: Accidental death of student on his way to deliver paper, incident on Sakhritola-Telitola road | Gondia: पेपर देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, साखरीटोला-तेलीटोला मार्गावरील घटना

Gondia: पेपर देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, साखरीटोला-तेलीटोला मार्गावरील घटना

googlenewsNext

साखरीटोला - बीएससीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर मोटारसायकलने जात असलेल्या विद्यार्थ्याच्या मोटारसायकलने एसटीला मागून धडक दिल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २६) दुपारी १ वाजता साखरीटोला-तेलीटोला मार्गावर घडली. महक राजेंद्र भांडारकर (२१) रा. इसनाटोला, ता. सालेकसा असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, महक भांडारकर व त्याचा मित्र बबलू मुनेश्वर हे दोघेही बुधवारी दुपारी मोटारसायकल क्रमांक एमएच ३५/एएस-८६६२ ने लोहारा येथील महाविद्यालयाला बीएससी प्रथम वर्ष द्वितीय सेमीस्टरचा पेपर देण्यासाठी साखरीटोला येथून निघाले होते. दरम्यान, गोंदिया-देवरी मार्गाची निळ्या रंगाची बस देवरीकडे होती. बस क्रमांक एसएमएच०७/सी-९३६० ने कारुटोला ओलांडल्यानंतर मध्यंतरी बसच्या समोर शेळी आल्याने चालकाने ब्रेक मारला. त्याच वेळी बसचा वेग कमी झाला. याच दरम्यान मोेटारसायकलने येत असलेल्या महक भांडारकरचे मोटारसायकलवरचे नियंत्रण जाऊन बसच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. ही धडक जोरदार होती की महकच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला बबलू किरकोळ जखमी झाला. दरम्यान, शेतात काम करीत असलेले कारुटोल्याचे सरपंच उमराव बोहरे व गावकरी यांनी घटनास्थळी पोहचून पोलिसांना माहिती दिली. बसमध्ये असलेल्या परीक्षार्थी विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मदत केली.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर आघात
महक भांडारकर हा राजेंद्र भांडारकर यांचा एकुलता मुलगा होता. त्याची आई सत्यभामा भांडारकर आशा वर्कर सुपरवायझर आहे. बुधवारी दुपारी महक पेपर देण्यासाठी मोटारसायकलने घरून निघाला. दरम्यान, त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने महकच्या कुटुंबावर मोठा आघात झाला.

Web Title: Gondia: Accidental death of student on his way to deliver paper, incident on Sakhritola-Telitola road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.