Gondia: फुल विसर्जन करायला गेलेला वृध्द नाल्यात वाहून गेला

By नरेश रहिले | Published: August 19, 2023 08:54 PM2023-08-19T20:54:55+5:302023-08-19T20:55:59+5:30

Gondia: घरातील देवांची पूजा केलेले फुल लोकांच्या पायाखाली येऊ नये म्हणून ती फुले नाल्यात विसर्जन करण्यासाठी गावातीलच नाल्यावर गेलेल्या ८० वर्षाच्या वृध्द नाल्यातील पुरात वाहून गेला.

Gondia: An old man who went to bathe a flower got swept away in a stream | Gondia: फुल विसर्जन करायला गेलेला वृध्द नाल्यात वाहून गेला

Gondia: फुल विसर्जन करायला गेलेला वृध्द नाल्यात वाहून गेला

googlenewsNext

- नरेश रहिले
गोंदिया - घरातील देवांची पूजा केलेले फुल लोकांच्या पायाखाली येऊ नये म्हणून ती फुले नाल्यात विसर्जन करण्यासाठी गावातीलच नाल्यावर गेलेल्या ८० वर्षाच्या वृध्द नाल्यातील पुरात वाहून गेला. ही घटना १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजता तिरोडा तालुक्याच्या चुरडी येथे घडली. शालीकराम प्रजापती (८०) असे पुरात वाहून गेलेल्या वृध्दाचे नाव आहे. घरातील देवाला वाहिलेले फुल कचऱ्यात न टाकता नाल्यात विसर्जन करण्यासाठी गेलेले शालीकराम नाल्यात फुले टाकत असतांना नाल्याला दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे पूर आल्याने ते पुरात वाहून गेले. तब्बल दोन तास होऊनही ते हाती लागले नव्हते. त्यांची शोध मोहीम सुरूच होती. तिरोडाचे ठाणेदार देविदास कठाडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून चोख बंदोबस्त ठेवला होता. मागील दोन दिवसापासून दमदार पाऊल येत असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत. त्यासाठी नदी, नाल्यावर कुणी जाऊ नका असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Web Title: Gondia: An old man who went to bathe a flower got swept away in a stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू