गोंदिया-बल्लारशा, कटंगी पॅसेंजर गाड्या मंगळवारपासून ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:31 AM2021-09-25T04:31:23+5:302021-09-25T04:31:23+5:30

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या मंगळवारपासून ...

Gondia-Ballarshah, Katangi passenger trains on track from Tuesday | गोंदिया-बल्लारशा, कटंगी पॅसेंजर गाड्या मंगळवारपासून ट्रॅकवर

गोंदिया-बल्लारशा, कटंगी पॅसेंजर गाड्या मंगळवारपासून ट्रॅकवर

Next

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या मंगळवारपासून (दि.२८) ट्रॅकवर येणार आहेत. यामुळे या पॅसेंजर गाड्या सुरू होण्यासाठी मागील दीड वर्षांपासून असलेली प्रतीक्षा संपली आहे. रेल्वे प्रवाशांसाठी ही निश्चितच गोड बातमी आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने शुक्रवारी (दि.२४) गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात पत्रक काढले आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून या गाड्या सुरू करण्यासाठी सुरू प्रवाशांची असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे. रेल्वे विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक्स्प्रेससह काही पॅसेंजर गाड्या बंद केल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहे. मात्र, पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता, तर भाजीपाला विक्रेते आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी जीवनदायिनी असलेल्या या पॅसेजर गाड्या बंद असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला होता. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना एसटी प्रवास करण्यासाठी दुप्पट पैसे माेजावे लागत होते. त्यामुळेच पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर रेल्वे विभागाने तब्बल १८ महिन्यांनंतर पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे विभागाने यासंदर्भातील पत्र शुक्रवारी जारी केले आहे.

...............

तिकीट आरक्षित करावे लागणार का ?

मंगळवारपासून (दि.२८) गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू होणार आहेत. मात्र, या गाड्यांमध्ये पूर्वीचप्रमाणेच रेल्वे स्थानकावरून तिकीट घेऊन प्रवास करता येणार की आरक्षण करावे लागणार याबाबत रेल्वेने अद्यापही स्पष्ट केले नाही. सोमवारी यासंदर्भातील दिशा निर्देश प्राप्त होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

...........

खिशावरील भार कमी होणार

पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद असल्याने प्रवाशांना एसटीने प्रवास करावा लागत होता. गोंदिया ते चंद्रपूर प्रवासाठी तब्बल ३०० रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर मंगळवारपासून धावणार असल्याने प्रवाशांना यासाठी केवळ ५० ते ६० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावरील भार कमी होणार आहे.

Web Title: Gondia-Ballarshah, Katangi passenger trains on track from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.